राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती भवन, 2021 च्या प्रेसिडेंट व्हिजिटर्स पुरस्कारांसाठी केंद्रीय विद्यापीठांचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले
Posted On:
25 AUG 2021 7:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2021
राष्ट्रपती भवनात 2021 च्या अभ्यागत पुरस्कारांसाठी (President Visitors Awards) केंद्रीय विद्यापीठांच्या
प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांकडून पुढे दिलेल्या विभागांअंतर्गत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत :
1. नावीन्यपूर्ण कार्यासाठी अभ्यागत पुरस्कार; 2. (a) मानव्य विद्या, कला आणि सामाजिक विज्ञान, (b) भौतिक शास्त्र आणि (c) जैविक विज्ञान यामधील संशोधनासाठी अभ्यागत पुरस्कार; आणि 3. तंत्रज्ञान विकासासाठी अभ्यागत पुरस्कार.
या पुरस्कारांसाठी www.presidentofindia.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन आणि 'सातवा अभ्यागत पुरस्कार, 2021' (7th Visitor's Award,2021) या लिंकला क्लिक करून अर्जदार अर्ज करु शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे. या संदर्भातील अधिक तपशील https://rb.nic.in/visitorawards या वर पहाता येईल.
केंद्रीय विद्यापीठांमध्ये निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्वोत्कृष्टतेच्या ध्यास घेत, जगभरातील सर्वोत्तम पद्धती स्वीकारून त्यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने 2014 मध्ये अभ्यागत पुरस्कार सुरू करण्यात आले
भारताचे राष्ट्रपती, केंद्रीय विद्यापीठांचे अभ्यागत म्हणून त्यांच्या अधिकारात, हे पुरस्कार प्रदान केले जातात.
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1748990)
Visitor Counter : 320