शिक्षण मंत्रालय
शालेय शिक्षणात अधिक समावेशकता साध्य करण्यासाठी अभिनव आभासी शाळा - धर्मेंद्र प्रधान
धर्मेंद्र प्रधान आणि वीरेंद्र कुमार यांनी नवीन शिक्षण धोरण - 2020 ची वर्षभरातील कामगिरी आणि काही प्रमुख उपक्रमांवरील पुस्तिकेचे संयुक्तपणे प्रकाशन केले
Posted On:
24 AUG 2021 4:18PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी आज नवीन शिक्षण धोरण (NEP)- 2020 ची वर्षभरातील कामगिरी आणि नवीन शिक्षण धोरणाच्या काही प्रमुख उपक्रमांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे संयुक्तपणे प्रकाशन केले. यात NIPUN भारत एफएलएन साधने , दीक्षा ; NIOS एनआयओएस ची आभासी शाळा; एनसीईआरटी (NCERT ) चे वैकल्पिक शैक्षणिक वेळापत्रक ; आणि एनसीईआरटी आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने विकसित केलेल्या 'प्रिया' या सुगम्यता पुस्तिकेचे प्रकाशन यांचा समावेश आहे.
उपस्थितांना संबोधित करताना प्रधान म्हणाले की शिक्षण ही केवळ पदवी मिळवण्याची स्पर्धा नाही तर व्यक्तिमत्व घडवणे आणि पर्यायाने राष्ट्र उभारणीसाठी ज्ञानाचा वापर करण्याचे साधन आहे. सरकार शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्याचे काम उदा. देशभरातील गावातील शाळांमध्ये इंटरनेटची व्याप्ती सुनिश्चित करणे आदी सुविधा सुलभ करण्यावर काम करत आहे.
प्रधान म्हणाले की, एनईपी हे लाखो युवकांच्या आशा आणि आकांक्षा वास्तवात साकारण्यासाठी आणि भारताला स्वावलंबी बनवणारे मार्गदर्शक तत्वज्ञान आहे. ते म्हणाले की, भारताला ज्ञानाचे जागतिक केंद्र बनवण्याचे सामायिक ध्येय साध्य करण्यासाठी एनईपीची आखणी हे सहकारी संघवादाचे जिवंत उदाहरण आहे. जेव्हा आम्ही एनईपीच्या प्रगतीकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल अधिक विश्वास वाटतो. प्रधान म्हणाले की, आज प्रकाशित केलेले “प्रिया - द अक्सेसिबिलिटी वॉरियर” हे पुस्तक दिव्यांगांसाठी सुगम्यतेच्या समस्यांबाबत विद्यार्थ्यांना जागरूक बनवेल. मुलांमध्ये त्यांच्या जडणघडणीच्या सुरुवातीच्या वर्षांपासून सुगम्यतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पुस्तिका सोपी, मनोरंजक आणि संवादात्मक बनवण्यावर विशेष भर दिला आहे, असेही ते म्हणाले.
एनआयओएसच्या व्हर्च्युअल स्कूलचे उदघाटन करताना ते म्हणाले की ही शाळा हे शिकण्याचे एक नवीन मॉडेल आहे आणि तंत्रज्ञानाचा आणि नावीन्यपूर्ण संशोधनाचा वापर करून शिक्षणात अधिक समावेशकता कशी आणता येईल याचे उदाहरण आहे. शाळा ही देशातील पहिलाच असा उपक्रम आहे जो व्हर्च्युअल लाईव्ह क्लासरूम आणि व्हर्च्युअल लॅबच्या माध्यमातून प्रगत डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म प्रदान करेल.
नवीन शिक्षण धोरणाचे एक वर्ष यावरील पुस्तिका पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
https://www.education.gov.in/sites/upload_files/mhrd/files/upload_document/nep_achievement.pdf
“Priya -The Accessibility Warrior”: ही पुस्तिका पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: https://ncert.nic.in/ComicFlipBookEnglish/mobile/
व्हर्च्युअल ओपन स्कूलचे तपशील पाहण्यासाठी यावर क्लिक करा: http://virtual.nios.ac.in/
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1748624)
Visitor Counter : 251