निती आयोग
नीति आयोग आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया यांनी संयुक्तपणे 'कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या वाहतूकीसाठीच्या मंचाची' भारतात केली सुरुवात
Posted On:
24 AUG 2021 5:29PM by PIB Mumbai
नीती आयोग आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (डब्ल्यूआरआय), भारत यांनी 23 ऑगस्ट रोजी एनडीएस - ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया (NDC-TIA) प्रकल्पाचा भाग म्हणून ‘कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या वाहतूकीसाठीच्या मंचाची ' भारतात सुरुवात केली. आभासी माध्यमाद्वारे झालेल्या कार्यक्रमात नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी उद्घाटन केले आणि या मंचाची सुरुवात करण्यात आली. विविध मंत्रालयाचे मान्यवर आणि एनडीएस - ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया प्रकल्पाचे भागीदार, वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्रातील संबंधित यावेळी उपस्थित होते. वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण करणाऱ्या आशियातील हरित वायू उत्सर्जन (वाहतूक क्षेत्र) ची उच्च पातळी खाली आणणे (2 अंश खाली आणण्याच्या अनुषंगाने) या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे.
भारतातील वाहतूक क्षेत्र मोठे आणि वैविध्यपूर्ण आहे, या क्षेत्राचा कार्बन उत्सर्जनात तिसरा क्रमांक आहे. (आंतराष्ट्रीय ऊर्जा संस्था, 2020; पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय, 2018) मधील माहिती असे सूचित करते की ,वाहतूक क्षेत्रात, एकूण कार्बन उत्सर्जनात रस्ते वाहतुकीचे 90% पेक्षा जास्त योगदान आहे. भारत सरकार विविध धोरणात्मक उपाय आणि उपक्रमांद्वारे देशात इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) स्वीकारण्यावर मुख्य लक्ष केंद्रित करून रस्ते वाहतुकीमधील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने सातत्याने कार्यशील आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि परिवर्तनशील वाहतूक आणि बॅटरी स्टोरेजसाठीच्या राष्ट्रीय मोहिमेद्वारे शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठीची धुरा नीती आयोग सांभाळत आहे.
कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या वाहतूकीसाठी संबंधित मंच देशातील इलेक्ट्रिक वाहतूक क्षेत्रासाठी एक निश्चितच महत्वाचा टप्पा आहे.हा मंच मुख्य कार्यकारी अधिकारी , संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, बहुपक्षीय संस्था, वित्तीय संस्था तसेच केंद्र आणि राज्य सरकार यांना एकत्रितरीत्या एकाच व्यासपीठावर आणेल. लक्ष्यित परिणाम आणि भारतात इलेक्ट्रिक वाहतूक वाढविण्यासाठी हा मंच नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल विकसित करण्यात मदत करेल. प्रभावी समन्वयन, सहकार्य आणि एकत्रीकरणाद्वारे भारतात प्रदूषण विरहीत स्वच्छ वाहतूक आणण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे असे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या मुख्य भाषणात सांगितले .
या प्रकल्पाच्या भारतातील अंमलबजावणीचा नीती आयोग भागीदार आहे.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1748589)
Visitor Counter : 367