आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 बाबत ताजी माहिती

Posted On: 21 AUG 2021 9:57AM by PIB Mumbai

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 57 कोटी 61 लाख मात्रा देण्यात आल्या

भारतात गेल्या 24 तासांत 34,457 नव्या रुग्णांची नोंद झाली

सध्याच्या कोविड सक्रीय रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.12% या मार्च 2020 पासूनच्या नीचांकी पातळीवर

देशात सध्या 3,61,340 कोविड सक्रीय रुग्ण आहेत, ही गेल्या 151 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे

रोगमुक्ती दरात वाढ होऊन सध्या तो 97.54% आहे, मार्च 2020 पासूनच्या सर्वात उच्चांकी पातळीवर

गेल्या 24 तासांत 36,347 जण बरे झाले; आता बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,15,97,982

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (1.98%) गेले 56 दिवस 3% पेक्षा कमी

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (2.00 %) गेले 26 दिवस 3% पेक्षा कमी

आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 50 कोटी 45 लाख चाचण्या करण्यात आल्या

***

STupe/SKane/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1747781) Visitor Counter : 196