संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्रालय /सेवा संकेत स्थळावर नियोजित खरेदीचे संबंधित तपशील प्रकाशित करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मान्यता

Posted On: 20 AUG 2021 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2021

ठळक वैशिष्ट्ये:-

  • व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन आणि भांडवल संपादन प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी घेतलेला निर्णय
  • उद्योगमूळ  सामग्री उत्पादकाशी तंत्रज्ञान संबंध स्थापित करण्याचे तसेच उत्पादनासाठी आणि क्षमता वृद्धीसाठी प्रक्रिया सुरु करण्यासाठी  नियोजन करू शकतो
  • मंजुरी मिळाल्यानंतर एका आठवड्यात तपशील संरक्षण मंत्रालय/सेवा संकेतस्थळावर प्रकशित करणार
  • सुरक्षेचा मुद्दा  ध्यानात घेतला जाईल

संरक्षण मंत्रालयाने नियोजित केलेल्या खरेदीचे तपशील विशेष करून किंमत, प्रमाण,ऑफसेट, चाचण्या, तंत्रज्ञान हस्तांतरण या संदर्भातले तपशील पाहण्याची संधी  मोठ्या प्रमाणात  उपलब्ध व्हावी अशी  मंत्रालयाची  सदैव भूमिका  राहिली आहे.

व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन आणि भांडवल संपादन प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी. उद्योगाच्या आकांक्षा लक्षात घेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, सेवा मुख्यालयाला, सेवा मुख्यालय/संरक्षण मंत्रालयाच्या संकेत स्थळावर, मंजुरी प्राप्त झाल्यानंतर एका आठवड्यात  संबंधित तपशील प्रसिध्द करणे अनिवार्य करणाऱ्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सुरक्षेचा संवेदनशीलतेचा   मुद्दा लक्षात घेऊनच तपशील सामायिक केला जाईल.

अधिक पारदर्शकतेच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल असून माहितीसाठी विनंतीला ( आरएफपी ) प्रतिसाद न देणाऱ्या मात्र आरएफपीसाठी स्वारस्य असणाऱ्या आणि बोली देऊ करणाऱ्या अतिरिक्त विक्रेत्यांना संधी प्रदान करणार आहे. वेळेवर पुढच्या दृष्टीक्षेपामुळे उद्योगाला, मूळ सामग्री उत्पादकाशी तंत्रज्ञान संबंध स्थापित करण्यासाठी तसेच, संभाव्य ऑर्डर लक्षात घेऊन उत्पादनासाठी आणि क्षमता वृद्धीसाठी प्रक्रिया सुरु करण्यासाठी  नियोजन शक्य होणार आहे.

 

S.Patil/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1747692) Visitor Counter : 161