आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 लसीकरणाविषयीची अद्ययावत माहिती
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 58 कोटी 31 लाखांहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्या
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे तसेच खासगी रुग्णालयांकडे 38 लाख मात्रा अजूनही शिल्लक आणि पुढील काळातील लसीकरणासाठी उपलब्ध
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2021 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2021
संपूर्ण देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करणे यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. देशात 21 जून 2021 पासून या लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला. लसीच्या अधिक मात्रांची उपलब्धता, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करता यावे यासाठी त्यांच्याकरिता उपलब्ध असलेल्या लसीच्या मात्रांची आगाऊ स्वरुपात माहिती पुरविणे आणि लस पुरवठा साखळीचे प्रवाहित मार्गीकरण या माध्यमातून लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यात येत आहे.
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा मोफत पुरवठा करून त्यांना पाठबळ पुरवीत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या या नव्या टप्प्यात केंद्र सरकार, देशातील लस निर्मात्यांनी उत्पादित केलेल्या लसीच्या साठ्यापैकी 75% साठ्याची खरेदी करून त्याचा (मोफत)पुरवठा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करणार आहे.
|
VACCINE DOSES
|
(As on 19 August 2021)
|
|
SUPPLIED
|
58,31,73,780
|
|
PIPELINE
|
81,10,780
|
|
CONSUMPTION
|
56,29,35,938
|
|
BALANCE AVAILABLE
|
38,00,030
|
सर्व उपलब्ध स्त्रोतांकडून मिळवलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांपैकी केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत एकूण 58 कोटी 31लाखांहून अधिक (58,31,73,780) मात्रांचा पुरवठा केला आहे आणि आणखी 81,10,780 मात्रांचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
या मात्रांपैकी, वाया गेलेल्या मात्रांची आकडेवारी जमेस धरून (आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार) आतापर्यंत एकूण 56,29,35,938 मात्रांचा वापर करण्यात आला आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे तसेच खासगी रुग्णालयांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या 38 लाखांहून अधिक (38,00,030) मात्रा अजूनही शिल्लक असून यापुढील काळातील लसीकरणासाठी त्या उपलब्ध आहेत.
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1747349)
आगंतुक पटल : 291
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam