माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

दूरदर्शनने "रग रग में गंगा" या प्रवासवर्णन कार्यक्रमाचे दुसरे पर्व सुरु केले


दूरदर्शन येत्या चार वर्षात सर्वाधिक पाहिली जाणारी वाहिनी बनेल- अनुराग ठाकूर

रग रग में गंगाचे पहिले पर्व 1.75 कोटी लोकांनी पाहिले

इतकी लांबी असलेल्या जगातील अव्वल 10 स्वच्छ नद्यांपैकी गंगा नदी एक आहे - गजेंद्र सिंह शेखावत

Posted On: 16 AUG 2021 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑगस्‍ट 2021 

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज "रग रग में गंगा" या यशस्वी प्रवासवर्णनाच्या दुसऱ्या पर्वाचे अनावरण केले. यावेळी  केंद्रीय जलशक्ती मंत्री  गजेंद्रसिंह शेखावत आणि केंद्रीय जल शक्ती आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल देखील उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना ठाकूर म्हणाले की, दुसऱ्या पर्वाची  सुरूवात ही पहिल्या पर्वाच्या  यशाचा एक प्रकारे मापदंडच  आहे, पहिले पर्व  1.75 कोटी प्रेक्षकांनी पाहिले होते. त्यांनी या  कार्यक्रमाच्या पडद्यामागील चमूचे अभिनंदन केले. ते म्हणाले  की दुसऱ्या पर्वाकडून अपेक्षा वाढल्या आहेत  आणि हा केवळ एक कार्यक्रम नाही तर जन भागीदारीतून  जन आंदोलनाचा प्रयत्न आहे.

लोकांना गंगा स्वच्छता उपक्रमात योगदान देण्यासाठी आमंत्रित करत ते म्हणाले की, गंगा नदीचा सर्व भारतीयांशी भावनिक संबंध आहे आणि भारतीयांशी तिचा  आध्यात्मिक संबंध आहे तसेच तिचे  खूप मोठे आर्थिक महत्त्व आहे. यावेळी त्यांनी जागतिक तापमान वाढीकडे लक्ष वेधले आणि आजच्या  हवामानविषयक आव्हानांचा सामना  करण्याच्या प्रयत्नांमध्ये मुलांना सहभागी करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले की, पुढील तीन ते चार वर्षांत दूरदर्शन ही  सर्वात जास्त पाहिली जाणारी वाहिनी  बनेल. ते पुढे म्हणाले की, ही वाहिनी दर्शकांना दूरदर्शनकडे आकर्षित करण्यासाठी चांगला आशय असलेली संहिता निर्माण करेल.

ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास  या मंत्राचा पुनरुच्चार केला आणि लोकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव ते शताब्दी महोत्सवासाठी विविध सरकारी कार्यक्रमांतर्गत उपक्रमात  सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.

'रग रग में गंगा' प्रवासवर्णनाच्या दुसऱ्या पर्वात या महान नदीच्या सांस्कृतिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक-आर्थिक बाबींचा  समावेश असेल आणि  निर्मलता आणि अविरलता  या संकल्पनेवर  केंद्रित असेल. गंगा नदीचे संवर्धन करण्यासाठी आणि तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी NMCG द्वारे केले जाणारे कार्य या प्रवासवर्णातून सर्वांसमोर येईल, आणि   NMCG च्या सहकार्याने दूरदर्शनवर याचे दुसरे पर्व सादर केले जाणार आहे. गंगा नदीची भव्यता आणि तिच्या संवर्धनाची गरज याकडे लक्ष वेधण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.  काव्यात्मकरीत्या चित्रित  केलेली ही मालिका नदी आणि तिचा परिसर , गंगा नदीचा आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक -आर्थिक वारसा आणि तिची सध्याची पर्यावरणीय स्थिती सर्वांसमोर सादर करेल. 26 भागांचा या प्रवासवर्णनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते राजीव खंडेलवाल यांनी केले आहे आणि 21 ऑगस्ट 2021 पासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8:30 वाजता डीडी नॅशनल वर प्रसारित  केले जाईल.

उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले की, तीन वर्षांच्या अल्प कालावधीत  गंगा नदीला इतक्या मोठ्या अव्वल दहा स्वच्छ नद्यांमध्ये स्थान मिळवून देण्यात सरकार यशस्वी झाले आहे. ते पुढे म्हणाले की, सरकारने हाती घेतलेल्या बहुतांश कार्यक्रमांनी निर्धारित वेळेपूर्वीच आपले लक्ष्य साध्य केले आहे आणि हे पंतप्रधान मोदींच्या 4 'पी'  मंत्राचा परिणाम आहे - राजकीय इच्छाशक्ती (पॉलिटिकल विल ), सार्वजनिक खर्च (पब्लिक स्पेंडिंग), हितधारकांबरोबर भागीदारी (पार्टनरशिप विथ स्टेकहोल्डर्स) आणि लोकांचा सहभाग (पीपल्स पार्टीसिपेशन)

या प्रसंगी संबोधित करताना प्रल्हाद सिंग पटेल यांनी रग रग मे गंगा चा दुसरा सिझन अर्थ - गंगा ला अर्पण केला जाणार आहे असे सांगितले. गंगा नदी आपल्या संस्कृतीच्या पायाचा विस्तार करणारी नदी आहे असे सांगत , त्यांनी लोकांना या अमृत महोत्सवी वर्षात गंगा नदीला भूतकाळातील वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचा निश्चय करण्याचे आवाहन केले.

 

पार्श्वभूमी:

स्वच्छ गंगा राष्ट्रीय योजना आणि दूरदर्शन हे गंगा नदीच्या सध्याच्या स्थितीबद्दल व्यापक प्रमाणावर जागृती निर्माण करण्यासाठी आणि गंगेला तिच्या भूतकाळातील वलय मिळवून देण्याच्या उद्देशाने एकत्र आले आहेत.

फेब्रुवारी 2019 मध्ये भारताच्या सर्वाधिक पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीवरील ट्रॅव्हलॉग  म्हणून 'रग रग मे गंगा'. हा महत्वाचा कार्यक्रम राष्ट्रीय प्रसारण सेवेच्या दूरदर्शन राष्ट्रीय चॅनल वरून प्रसारित होण्यास सुरुवात झाली. स्वच्छ गंगा राष्ट्रीय मिशन द्वारे तयार केलेली ही 21 भागांची मालिका  आहे. या कार्यक्रमात गंगेचे उगमस्थान म्हणजे गोमुख हिमशिखरापासून ते गंगा बंगालच्या उपसागराला जिथे मिळते तेथे गंगासागर स्थाना पर्यंतचा 2525 किलोमीटर अंतराचा प्रवास चित्रित करण्यात आला आहे.

प्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल याने संचालित केलेल्या या ट्रॅव्हलॉग मध्ये गंगेच्या काठावरील सांस्कृतिक आणि सामाजिक आर्थिक महत्त्वाच्या वीस शहरांमधील प्रवासाचे चित्रीकरण आणि माहिती दाखवली आहे. गंगेची सांस्कृतिक, पौराणिक आणि ऐतिहासिक माहिती तसेच तिच्या काठावर बसलेले लोकजीवन यांची माहिती देतानाच, गंगा स्वच्छ करण्याचा संदेश, नदी स्वच्छ ठेवण्यात महत्वाची असलेली जनभागीदारी आणि गंगा नदीला स्वच्छ करून तिला पूर्वीचे रूप प्राप्त करून देण्यात राष्ट्रीय स्वच्छ गंगा योजनेचा सहभाग या सर्व बाबींचा या ट्रॅव्हलॉगमध्ये वेध घेतलेला आहे.

याआधी संपलेल्या भागांच्या मालिकेत गंगा बंगालच्या उपसागरात विलीन होते गंगासागर या भागापर्यंत मालिका येऊन ठेपली होती. जिथे गंगा भारतातून बाहेर पडून बांगलादेश मध्ये प्रवेश करते आणि रिव्हर पद्मा म्हणून ओळखली जाऊ लागते त्या मुर्शिदाबाद या जिल्ह्यापर्यंतच्या तिच्या प्रवासाने भाग-2 समाप्त होईल. 26 भागांच्या या मालिकेने गंगेला पुनरुज्जीवन देऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी मनावर कोरून ठेवण्यासारखे अनेक संदेश दिले आहेत. शतकानुशतके गंगा तिच्या काठावर असे लोकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी ज्या बहुमूल्य भेटी देत आली आहे त्यांचे ऋण या मालिकेतून लक्षात येईल. प्रचंड संशोधनाने समृद्ध असा हा कार्यक्रम गंगेची स्वच्छता याशिवाय सरकारकडून त्या बाबतीत घेतली जाणारी काळजी याबाबतीतील गंगेची आत्ताची परिस्थिती अधोरेखित करतो, याशिवाय लोकांना याबाबतीत भूमिका घेण्याचे आवाहनही करतो.

रग रग मे गंगा 2 हा मनोरंजन आणि माहिती यांचे योग्य मिश्रण असलेला कार्यक्रम आहे. या मालिकेमुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रेक्षकांना गंगा नदीच्या समृद्ध परंपरेची  जाणीव होईल.रग रग में गंगा 1 याला मिळालेली मोठी लोकप्रियता बघता अत्युच्च दर्जा असलेली ही प्रमुख मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला सज्ज झाली आहे असे म्हणता येईल. ट्रॅव्हलॉग असण्याबरोबरच ही मालिका जल-संरक्षणाचा आणि आणि जल- स्वच्छतेचा म्हणजेच अविरलता आणि निर्मळता यांचा संदेश देईल. ही काळाची गरज आहे.

* * *

M.Chopade/S.Kane/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1746480) Visitor Counter : 272