नागरी उड्डाण मंत्रालय

नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली 10 संस्थांना ड्रोन वापरण्याची परवानगी

Posted On: 16 AUG 2021 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑगस्‍ट 2021 

 

नागरी उड्डाण मंत्रालय (MoCA) आणि नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांनी 10 संस्थांना मानवरहित विमान प्रणाली (UAS) नियम, 2021 मधून सशर्त सूट दिली आहे.

या दहा संस्थांमध्ये महाराष्ट्रातील चार संस्थांचा समावेश आहे. त्या संस्था आणि त्यांची कार्ये अशी:-

  • महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या आदिवासी भागात आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रायोगिक BVLOS ड्रोन उड्डाणे आयोजित करण्यासाठी मुंबईच्या नॅशनल हेल्थ मिशन (राष्ट्रीय आरोग्य अभियान) ची निवड.  
  • तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात अनुक्रमे भात आणि मिरी पिकावर ड्रोन आधारित कृषी चाचण्या आणि अचूक फवारणीसाठी मुंबईच्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीला परवानगी
  • ड्रोन आधारित कृषी संशोधन उपक्रम आणि कृषी फवारणीसाठी मुंबईच्या बायर क्रॉप सायन्सची निवड.  
  • आयआयटीएम भोपाळ, एनडीए, पुणे, कराड विमानतळ, उस्मानाबाद विमानतळ, मोहम्मद एअरफील्ड, फर्रुखाबाद या 5 ठिकाणी वातावरणीय संशोधनासाठी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे ह्यांना परवानगी मिळाली आहे. 

ही परवानगी मंजुरीच्या तारखेपासून किंवा पुढील आदेशापर्यंत यापैकी जे आधी असेल त्या कालावधीसाठी वैध आहे आणि डीजीसीएने जारी केलेल्या मानक नियमावलीच्या अटी व शर्तींच्या अधीन असेल.  

या परवानग्यांच्या तपशीलांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

S. No.

Entity Name

Purpose

1

Government of Karnataka

Drone based aerial survey for creating urban property ownership records in Bengaluru

2

National Health Mission, Mumbai

For conducting experimental BVLOS drone flights to deliver essential healthcare items in tribal areas of Jawhar in Palghar district of Maharashtra

3

Gangtok Smart City Development

Drone based aerial survey for Smart City Project

4

Steel Authority of India, IISCO Steel Plant, Burnpur, West Bengal

For conducting perimeter surveillance of the plant

5

Asia Pacific Flight Training Academy, Hyderabad, Telangana

For conducting remote pilot training using drones

6

Blue Ray Aviation, Gujarat

For conducting remote pilot training using drones

7

Tractors and Farm Equipment Limited, Chennai

For conducting drone based aerial spraying to assess crop health & prevent crop disease

8

Mahindra & Mahindra, Mumbai, Maharashtra

For conducting drone based agricultural trials & precision spraying on paddy & hot pepper crop in the state of Telangana & Andhra Pradesh respectively

9

Bayer Crop Science, Mumbai, Maharashtra

For conducting drone based agricultural research activities & agricultural spraying

 

 

 

10

Indian Institute of Tropical Meteorology, Pune

For atmospheric research at these 5 locations:

-IITM Bhopal

-NDA, Pune

-Karad Airport

-Osmanabad Airport

- Mohammed Airfield,Farrukhabad

 

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाची लिंक उपलब्ध आहे. 


* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1746406) Visitor Counter : 319