राष्ट्रपती कार्यालय
पारशी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा
Posted On:
15 AUG 2021 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2021
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पारशी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, "पारशी नवीन वर्षाच्या शुभप्रसंगी, मी सर्व देशवासियांना विशेषत: आमच्या पारशी बंधू आणि भगिनींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा.
सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात पारशी समाजाचे योगदान अतुलनीय आहे. त्यांची जीवनशैली, कार्यशैली आणि संस्कृतीच्या रक्षणाप्रति त्यांची असलेली अपार निष्ठा बघता पारशी समाजाप्रति देशवासीयांमध्ये कौतुकाची भावना आहे. पारशी समाजाकडून साजरा करण्यात येणारा हा वार्षिक सण त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचे निमित्त आहे.
पारशी नवीन वर्षाचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात एकता, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो आणि नागरिकांमध्ये परस्पर सौहार्द आणि बंधुत्वाची भावना अधिक बळकट होवो ”.
Click here to see President's message in Hindi
* * *
S.Thakur/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746150)
Visitor Counter : 167