आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात आतापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुमारे 54 कोटी


गेल्या 24 तासात 73 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.46%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 36,083 नवे दैनंदिन रुग्ण

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या(3,85,336) ही आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या 1.20% इतकी

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर(1.88%) गेले 20 दिवस 3% पेक्षा कमी

Posted On: 15 AUG 2021 10:08AM by PIB Mumbai

भारतात  कोविड-19  प्रतिबंधक लसीकरणाने  54  कोटींचा टप्पा ओलांडला. आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण  61,35,193 सत्रांद्वारे  54,38,46,290  मात्रा देण्यात आल्या  आहेत.गेल्या 24 तासात 73,50,553 मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये यांचा समावेश आहे-

HCWs

1st Dose

1,03,49,901

2nd Dose

80,93,907

FLWs

1st Dose

1,82,76,459

2nd Dose

1,21,45,936

Age Group 18-44 years

1st Dose

19,58,22,860

2nd Dose

1,52,60,695

Age Group 45-59 years

1st Dose

11,70,84,332

2nd Dose

4,55,80,689

Over 60 years

1st Dose

8,10,41,849

2nd Dose

4,01,89,662

Total

54,38,46,290

 

 

21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा  टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध  आहे.

कोरोनातून बरे होण्याचा दर 97.46% झाला  आहे.

महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,13,76,015  रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 37,927  रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

गेल्या 24 तासात 36,083 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

सलग 49  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,85,336  असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  1.20%  आहे.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत सातत्याने  वाढ होत असून   देशात गेल्या 24 तासात 19,23,863 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 49.36 कोटीहून अधिक (49,36,24,440) चाचण्या केल्या आहेत.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ केली जात असताना  साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.00% आहे आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर  आज 1.88% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले   20  दिवस 3% पेक्षा कमी तर सलग  69 दिवस  5% पेक्षा कमी आहे.

***

MaheshC/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1746045) Visitor Counter : 203