संरक्षण मंत्रालय
राष्ट्रपतींनी विंग कमांडर वरूण सिंह (27987) फ्लाइंग (पायलट) यांना शौर्य चक्र प्रदान केले
Posted On:
15 AUG 2021 9:00AM by PIB Mumbai
विंग कमांडर वरुण सिंग (27987) फ्लाइंग (पायलट) लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) स्क्वाड्रनमध्ये पायलट आहेत .
12 ऑक्टोबर 20 रोजी, फ्लाइट कंट्रोल सिस्टीम (FCS) आणि प्रेशरायझेशन सिस्टीम (लाइफ सपोर्ट एन्व्हायर्नमेंट कंट्रोल सिस्टीम) मध्ये मोठ्या सुधारणा केल्यानंतर, ते मुख्य तळापासून दूर LCA मध्ये प्रणालीच्या चाचणीसाठी उड्डाण करत होते.
उड्डाणा दरम्यान, कॉकपिट दाब उच्च उंचीवर अयशस्वी ठरला. त्यांनी ते योग्यरित्या ओळखले आणि लँडिंगसाठी कमी उंचीवरून उतरण्यास सुरुवात केली. उतरताना, फ्लाइट कंट्रोल सिस्टीममध्ये बिघाड झाला आणि यामुळे विमानाचे नियंत्रण पूर्णपणे निसटले. हे अभूतपूर्व आपत्तीजनक अपयश होते जे कधीही घडले नव्हते. साधारण स्थितीत उंचीचा वेगाने तोटा होत विमान वर खाली हेलकावे घेत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती . अत्यंत जीवघेण्या परिस्थितीत अत्यंत शारीरिक आणि मानसिक तणावात असूनही, त्यांनी अनुकरणीय संयम दाखवला, आणि विमानाचे नियंत्रण पुन्हा मिळवले, ज्यातून उल्लेखनीय उड्डाण कौशल्य दिसून आले. त्यानंतर लगेचच सुमारे 10 हजार फुटांवर, विमानाने अनियंत्रित पिचिंगसह संपूर्ण नियंत्रण गमावले. अशा परिस्थितीत, वैमानिकाला विमानातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य होते. स्वतःच्या जीवाला असलेल्या संभाव्य धोक्याचा सामना करत त्यांनी लढाऊ विमाने सुरक्षितपणे उतरवताना विलक्षण धैर्य आणि कौशल्य दाखवले. त्यांनी कर्तव्याच्या पलीकडे जात जोखीम घेत विमान उतरवले. यामुळे स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानातील दोषांचे अचूक विश्लेषण करणे शक्य झाले आणि पुनरावृत्ती झाल्यास प्रतिबंधात्मक उपाय करता आले. त्यांच्या उच्च व्यावसायिकता , संयम आणि त्वरित निर्णय घेण्यामुळे, त्यांच्या जीवाला धोका असतानाही, त्यांनी केवळ लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट एलसीएचे नुकसान टाळले नाही, तर जमिनीवरील नागरी मालमत्ता आणि लोकसंख्येचे देखील रक्षण केले.
या अपवादात्मक शौर्याबद्दल विंग कमांडर वरूण सिंह यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे.
***
JaideviPS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746034)
Visitor Counter : 270