संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्क्वाड्रन लीडर दीपक मोहनन (30223){ फ्लाइंग (पायलट)} यांना राष्ट्रपतींकडून वायू सेना पदक (शौर्य ) प्रदान

Posted On: 15 AUG 2021 9:00AM by PIB Mumbai

स्क्वाड्रन लीडर दीपक मोहनन (30223) फ्लाइंग (पायलट) एप्रिल 2017 पासून तटरक्षक दलाच्या स्क्वाड्रनवर प्रतिनियुक्तीवर आहेत .

04 सप्टेंबर 2020 रोजी, चेतक हेलिकॉप्टरचे कॅप्टन म्हणून स्क्वाड्रन लीडर मोहनन यांनी अत्यंत उच्च दर्जाचे विलक्षण धैर्य आणि व्यावसायिक कौशल्य दाखवले , ज्यामध्ये त्यांनी श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यावर 3.40 लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या ऑन-बोर्ड एमटी डायमंडवरील आग आणि स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यमापन केले. या सात दिवसांच्या मोहिमेदरम्यान, त्यांनी 14:25 तासांची 12 उड्डाणे केली ज्यासाठी भारतीय तटरक्षक जहाजांच्या विविध श्रेणींवर वारंवार डेक लँडिंग आवश्यक होते आणि जहाजांना कार्यक्षम अग्निशामक व्यवस्था आणि तेल गळतीचे हवाई सर्वेक्षण करण्यासाठी दिशानिर्देश दिले. ही सर्व कामे समुद्रात अतिसामान्य स्थितीत, वाईट दृश्यमानता आणि 30 नॉट्सपेक्षा जास्त वादळी वारा, धोकादायक समुद्री स्थितीत केली जात होती. या अधिकाऱ्याने आपल्या जिवाला मोठा धोका असूनही या मिशनचा पाठपुरावा केला. वैयक्तिक सुरक्षेची पर्वा न करता शौर्य आणि अटल संकल्प सेवेच्या सर्वोच्च परंपरांच्या भावनेने त्यांनी काम केले. अविश्वसनीय आणि उत्साही प्रतिसादाने भीषण आग विझवण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आणि स्फोट आणि तेल गळतीचा संभाव्य धोका टाळता आला ज्यामुळे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात भारतीय तटरक्षक दलाला पूर्ण श्रेय मिळाले.

या अपवादात्मक शौर्य कामगिरीसाठी , स्क्वाड्रन लीडर दीपक मोहनन यांना वायु सेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले आहे.

***

MaheshC/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(Release ID: 1746019) Visitor Counter : 321