कृषी मंत्रालय

अन्न आणि पोषण सुरक्षेकरिता कृषी जैवविविधता बळकट करण्यासाठी ब्रिक्स भागीदारी


ब्रिक्सच्या कृषीविषयक कृती गटाची बैठक

भारताकडे ब्रिक्सचे 2021 चे अध्यक्षपद

Posted On: 14 AUG 2021 3:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2021

‘अन्न आणि पोषण सुरक्षेकरिता कृषी जैवविविधता बळकट करण्यासाठी ब्रिक्स भागीदारी’ या विषयावर ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची भारताच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. उपासमार आणि गरिबीचे उच्चाटन करण्याकरता निर्धारित करण्यात आलेली 2030 शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांमध्ये ब्रिक्स देश आघाडीची भूमिका घेण्यासाठी सज्ज झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या 2030च्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. ब्रिक्स देशांमध्ये असलेला संशोधनाचा भक्कम पाया, ज्ञानाचा लाभ घेण्याची आणि त्याची देवाणघेवाण करण्याची गरज, जास्त उत्पादकतेसाठी विशेषतः हवामान बदलाच्या स्थितीत प्रयोगशाळेतून शेतजमिनीपर्यंत तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर या मुद्द्यांवर बैठकीत विशेष भर देण्यात आला. कृषी क्षेत्रात संशोधन, विस्तार, तंत्रज्ञान हस्तांतरण, प्रशिक्षण आणि क्षमता वृद्धीसाठी भारताने ब्रिक्स( ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) कृषी संशोधन मंच विकसित केला आहे. ब्रिक्स कृषी संशोधन मंच कार्यरत करण्याची आवश्यकता आणि उत्पादक आणि प्रक्रियाकर्ते यांच्या गरजा भागवण्यासाठी कृषी तंत्रज्ञानाचा वापर आणि उपयोजन यात सुधारणा करण्यासाठी संशोधन सहकार्याला चालना देण्याचे महत्त्व यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

 ब्रिक्सच्या 11 व्या बैठकीचा संयुक्त जाहीरनामा आणि ब्रिक्स देशांच्या 2021 ते 2024 साठी कृषी सहकार्याविषयीची कृती योजना आणि ब्रिक्स कृषी संशोधन मंच यावर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. ब्रिक्सच्या बैठकीत 2021-24 च्या कृती योजनेचा स्वीकार करण्यासाठी ब्रिक्स कार्यगटाची बैठक शिफारस करेल.

12-13 ऑगस्ट 2021 रोजी नवी दिल्लीत सुषमा स्वराज भवनमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल, अतिरिक्त सचिव अभिलाषा लिखी, संयुक्त सचिव अलकनंदा दयाल उपस्थित होते.

 

 N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745769) Visitor Counter : 243