पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम 2021 सरकारकडून अधिसूचित


30 सप्टेंबर 2021 पासून प्लास्टिक  थैल्यांची जाडी 50 मायक्रोन वरून वाढवून 75 मायक्रोन तर 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रोन करण्यात आली आहे

विस्तारित उत्पादक उत्तरदायीत्वासाठीच्या मार्गदर्शक तत्वांना कायद्याचे पाठबळ

Posted On: 13 AUG 2021 8:44PM by PIB Mumbai

 

एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकला 2022 पर्यंत टप्याटप्याने हद्दपार करण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानेएकल वापराच्या, निश्चित केलेल्या प्लास्टिक वस्तूंना प्रतिबंध करणारे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम 2021 अधिसूचित केले आहेत. 2022 पर्यंत,कमी उपयोगाच्या आणि मोठ्या प्रमाणात कचरा करणाऱ्या एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंना  प्रतिबंधित करणारा हा नियम आहे.

एकल वापराच्या प्लास्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी कृती करण्याकरिता भारत कटीबद्ध आहे. 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या चौथ्या पर्यावरण सभेत एकल वापराच्या प्लास्टिक उत्पादनामुळे होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात ठराव मांडला होता.या अतिशय महत्वाच्या विषयाची जागतिक समुदायाने तातडीने दखल  घ्यावी असा याचा उद्देश होता.  या ठरावाचा या सभेत स्वीकार हे महत्वाचे पाऊल होते.

1 जुलै 2022 पासून पॉलीस्टीरीन आणि विस्तारित पॉलीस्टीरीन सह एकल-उपयोगाच्या खालील  प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन,   आयात, साठवणूक , वितरण, विक्री आणि  उपयोग  प्रतिबंधित करण्यात येईल-

.. प्लास्टिक काडी असलेल्या ईअरबड्स,फुगे, झेंडे, कॅन्डी आणि आईसक्रिमना असलेल्या प्लास्टिक काड्या, सजावटीसाठीचे पॉलीस्टीरीन [थर्माकोल];

.. प्लेट, कपपेलेकाटे-चमचेसुरी, स्ट्रॉमिठाईच्या खोक्याभोवती, निमंत्रण पत्रीकेभोवती, सिगारेट पाकीटाभोवती गुंडाळण्यात येणारी फिल्म, 100 माइक्रोन पेक्षा कमी जाडीची प्लास्टिक किंवा  पीव्हीसी बॅनर, स्टरर.

हलक्या वजनाच्या प्लास्टिक थैल्यामुळे निर्माण होणारा कचरा थांबवण्यासाठी 30 सप्टेंबर 2021 पासून प्लास्टिक  थैल्यांची जाडी 50 मायक्रोन वरून वाढवून 75 मायक्रोन तर 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रोन करण्यात आली आहे. जाडी वाढवल्याने या थैलीचा दुसऱ्यांदा उपयोग शक्य होणार आहे.

विस्तारित निर्माता उत्तरदायीत्वाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या संदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांना प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम 2021 द्वारे कायद्याचे पाठबळ देण्यात आले आहे.एकल वापर प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी जनजागृती आणि  प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार उपाययोजना करत आहे.

एकल वापराच्या प्लास्टिकला कल्पक पर्याय तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी डिजिटल तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता इंडिया प्लास्टिक चलेंज- हॅकेथॉन 2021 आयोजित करण्यात आले असून स्टार्ट अप इंडिया उपक्रमा अंतर्गत स्टार्ट अप्स आणि उच्च शिक्षण संस्थामधल्या विद्यार्थ्यांसाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.

राजपत्र अधिसूचना  

***

M.Chopade/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745602) Visitor Counter : 1168