संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदल आणि सौदी अरेबियाच्या नौदलादरम्यान पहिला अल् मोहेद अल् हिंदी सराव

Posted On: 12 AUG 2021 8:55PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाच्या शिष्टमंडळाने नुकतीच सौदी अरेबियाला भेट दिली. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न फ्लीटचे प्रमुख ध्वज अधिकारी(FOCWF) रीअर ऍडमिरल अजय कोचर यांनी सौदी अरेबियाच्या ईस्टर्न फ्लीटचे फ्लीट कमांडर रीअर ऍडमिरल माजिद अल कहतानी यांची 10 ऑगस्ट 2021 रोजी सौदी अरेबियाच्या ईस्टर्न फ्लीटचे मुख्यालय असलेल्या किंग अब्दुल अजीज नौदल तळावर भेट घेतली. कोचर यांनी किंग फहाद नौदल अकादमीला देखील भेट दिली आणि  कमांडंट रीअर ऍडमिरल फैजल बिन फहाद अल् घुफैली यांची भेट घेतली. सौदी अरेबियामधील भारताचे राजदूत डॉ. औसाफ सईद यांनी अल जुबैल येथे आयएनस कोची या जहाजावर कोचर यांच्यासोबत वार्ताहर परिषद घेतली. 11 ऑगस्ट 2021 रोजी या दोघांनी सौदी अरेबियाच्या ईस्टर्न प्रॉव्हिन्सचे गव्हर्नर सौद बिन नयेफ अल्  सौद यांची दमाम येथे भेट घेतली. भारतीय नौदल आणि सौदी अरेबियाच्या नौदलादरम्यान पहिल्या अल् मोहेद अल् हिंदी या सरावाचे आयोजन होणार आहे. या सरावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या नौदलांच्या अधिकाऱ्यांनी अल जुबैल मधील किंग अब्दुलअजीज नौदल तळावर समन्वय परिषदेमध्ये परस्परांची भेट घेतली. परस्परांच्या कार्य पद्धतींचा सखोल अभ्यास करण्याच्या उद्देशाने दोन्ही नौदलांच्या तज्ञांच्या व्याख्यानांचे देखील यावेळी आयोजन करण्यात आले.

***

M.Iyengar/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1745274) Visitor Counter : 205