आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 52 कोटी मात्रा देण्याचा नवा टप्पा केला पार
गेल्या 24 तासात, लसीच्या 44 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
आतापर्यंतचा सर्वोच्च 97.45% चा रोगमुक्ती दर गाठण्यात भारत यशस्वी
गेल्या 24 तासांत देशात 41,195 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या (3,87,987) एकूण बाधितांच्या संख्येच्या 1.21%
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.94%) गेल्या सलग 17 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी
Posted On:
12 AUG 2021 10:11AM by PIB Mumbai
भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी 52 कोटींचा मोठा टप्पा ओलांडला आहे.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 59,97,068 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 52,36,71,019 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 44,19,627 मात्रा देण्यात आल्या.
या मात्रांमध्ये खालील मात्रांचा समावेश आहे:
HCWs
|
1st Dose
|
1,03,41,119
|
2nd Dose
|
80,34,194
|
FLWs
|
1st Dose
|
1,82,48,485
|
2nd Dose
|
1,19,35,584
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
18,47,82,179
|
2nd Dose
|
1,34,26,569
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
11,40,17,033
|
2nd Dose
|
4,40,01,065
|
Over 60 years
|
1st Dose
|
7,95,91,513
|
2nd Dose
|
3,92,93,278
|
Total
|
52,36,71,019
|
देशात 21 जून 2021 पासून कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला. संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
भारतातील रोगमुक्ती दर आता 97.45% झाला आहे. महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत भारताने गाठलेला हा सर्वोच्च रोगमुक्ती दर आहे.
देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,12,60,050 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासात 39,069 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले.
भारतात गेल्या 24 तासात, दैनंदिन पातळीवर 41,195 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग सेहेचाळीस दिवस 50,000 हून कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 3,87,987 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या फक्त 1.21% इतके आहे आणि मार्च 2020 पासूनचे हे सर्वात नीचांकी प्रमाण आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासात देशात एकूण 21,24,953 चाचण्या करण्यात आल्या. देशात कोविड महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकंदर 48 कोटी 73 लाखांहून अधिक (48,73,70,196) चाचण्या करण्यात आल्या.
देशभरात एकीकडे कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.23% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.94% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 17 दिवस 3% हून कमी आहे आणि गेले सलग 66 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.
***
ST/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1745161)
Visitor Counter : 257