संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्कराचा चमू तेहराम शेर हिमशिखरांमधील 5 अस्पर्शित शिखरे एकाच वेळी सर करण्याचा प्रयत्न करणार

Posted On: 11 AUG 2021 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2021

सियाचीन हिमशिखरांजवळील  तेहराम शेर हिमशिखरांमधील 5 अस्पर्शित शिखरे सर करण्यासाठी  निघालेल्या मोहिमेला 9 ऑगस्ट 2021 रोजी चीफ ऑफ स्टाफ, फायर अँड फ्युरी कोअर मेजर जनरल आकाश कौशिक यांनी सियाचेन बेस कॅम्प वरून  हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

भारतीय लष्करातील लडाख स्काऊट तुकडीतील गिर्यारोहक एकाच वेळी APSARASAS I, APSARASAS II, APSARASAS III, PT-6940 आणि PT-7140 ही शिखरे सर करण्याचा  प्रयत्न करतील. बेस कॅम्पवर आयोजित सोहळ्याला सियाचेन बेस कॅम्पवर तैनात तुकड्या तसेच भारतीय लष्करात सेवा बजावलेल्या दिग्गज स्थानिकांची उपस्थिती होती.

 

M.Iyengar/V.Sahjrao/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1744906) Visitor Counter : 200