रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानाचा वापर करून इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ईटीसी) प्रणालीची देशभरात अंमलबजावणी
Posted On:
09 AUG 2021 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2021
पथकर संकलन कार्यक्षम करण्यासाठी आणि वेगवान वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानाचा वापर करून इलेक्ट्रॉनिक पथकर संकलन प्रणालीची देशभरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. डिजिटल मोडद्वारे पथकर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि फी प्लाझाद्वारे विनाथांबा प्रवासासाठी सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील फी प्लाझाच्या सर्व लेन 15/16 फेब्रुवारी 2021 च्या मध्यरात्रीपासून "फी प्लाझाच्या फास्टॅग लेन" म्हणून घोषित केल्या आहेत. FASTag लेन म्हणून सर्व लेन घोषित केल्यानंतर, एकूण FASTag चा वापर अंदाजे 96%पर्यंत पोहोचला आहे.
पथकर संकलनासाठी तंत्रज्ञानात सुधारणा ही एक अखंड प्रक्रिया आहे आणि सरकार या क्षेत्रातील घडामोडींचा सक्रियपणे पाठपुरावा करत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1744088)
Visitor Counter : 233