युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

टोक्यो ऑलिंपिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाला 65 किलो वजनीगटात कांस्यपदक, भारताचे स्पर्धेतील सहावे पदक

Posted On: 07 AUG 2021 5:19PM by PIB Mumbai

 

ठळक वैशिष्ट्ये:

  • कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात कझाकस्तानच्या दौलत नियाझबेकोव्हला 8-0 असे पराभूत केले
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या कामगिरीबद्दल बजरंग पुनियाचे अभिनंदन
  • बजरंगचे अभिनंदन करताना क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, मला तुमचा खूप अभिमान वाटतो, प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवणारी तुमची कामगिरी आणि कुस्तीचा खूपच चांगला शेवट पाहणे अतिशय आनंददायी होते.

 

भारतीय कुस्तीसाठी एक विशेष क्षण!

#Tokyo2020 कांस्यपदक जिंकल्याबद्दल बजरंग पुनियाचे अभिनंदन. अनेक वर्षांचे अथक प्रयत्न, सातत्य आणि दृढनिश्चय यामुळे तुम्ही स्वतःचे वेगळेपणे सिद्ध केले आहे. तुमच्या यशामध्ये प्रत्येक भारतीय सहभागी आहे !

भारताचे राष्ट्रपती (@rashtrapatibhvn) August 7, 2021

#Tokyo2020! नेत्रदीपक लढत@BajrangPunia. प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद आणि आनंददायी असलेल्या तुमच्या कामगिरीबद्दल तुमचे अभिनंदन.

—  नरेंद्र मोदी(@narendramodi) August 7, 2021

***

S.Thakur/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1743640) Visitor Counter : 185