सांस्कृतिक मंत्रालय
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी उद्या 'भारत छोडो' चळवळीच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त एका प्रदर्शनाचे उद्घाटन करणार
आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून राष्ट्रीय अभिलेखागार हे प्रदर्शन सादर करत आहे
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2021 6:56PM by PIB Mumbai
ठळक मुद्दे:
- सांस्कृतिक राज्यमंत्री,अर्जुन राम मेघवाल आणि मीनाक्षी लेखी उद्घाटनाला उपस्थित राहणार
- प्रदर्शन 9 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत खुले राहील
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त साजरा होणाऱ्या आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, राष्ट्रीय अभिलेखागार उद्या 'भारत छोडो चळवळी'च्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त एक प्रदर्शन सादर करत आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी हे संसदीय कार्य आणि सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि परराष्ट्र आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या उपस्थितीत 8 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11:30 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन करतील.
सार्वजनिक नोंदी, खाजगी कागदपत्रे, नकाशे, छायाचित्रे आणि इतर संलग्न साहित्यातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील भारत छोडो चळवळीचे महत्त्व उलगडून दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे.
हे प्रदर्शन 9 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत जनतेसाठी खुले राहील.

***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1743632)
आगंतुक पटल : 230