गृह मंत्रालय

हैदराबादमधल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) 72 व्या तुकडीच्या परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांचे दीक्षांत संचलन


केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

परेडमध्ये 144 तरुण आयपीएस परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसह 33 महिला अधिकारी

Posted On: 06 AUG 2021 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑगस्‍ट 2021

 

हैदराबादमधल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत आज भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) 72 व्या तुकडीच्या परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांचे दीक्षांत संचलन झाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यावेळी प्रमुख पाहुणे होते. राष्ट्रीय पोलीस अकादमीचे संचालक  अतुल करवल आणि इतर वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001K535.jpg

पंतप्रधानांचे 'नेहमी राष्ट्र प्रथम' आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे न्याय्य कार्य आणि संवेदनशील पोलीस, ही मूळ तत्त्वे तुम्हाला चांगली अवगत आहेत, असे नित्यानंद राय यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांच्या आशा आणि अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणाले की, भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या मूल्यांनुसार तुम्ही कायद्याचे संरक्षक व्हावे अशी जनतेची इच्छा गृह राज्यमंत्र्यांनी व्यक्त केली.  हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमच्याकडे निष्पक्षता, सचोटी, नम्रता, धैर्य, बांधिलकी, संघभावना आणि सत्यासाठी उभे राहण्याची क्षमता असेल, असे त्यांनी सांगितले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00256XK.jpg

दीक्षांत संचलनात  33 महिला पोलीस अधिकारी असल्याचे कौतुक त्यांनी केले. भारतीय पोलीस सेवेतील त्यांच्या कामगिरीबद्दल गृह राज्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि या सेवेत आणखी महिला दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003HZLC.jpg

परेडमध्ये 33 महिला अधिकाऱ्यांसह 144 तरुण आयपीएस परिवीक्षाधीन अधिकारी सहभागी झाले होते. या वर्षी दोन्ही उच्च पदे महिला अधिकाऱ्यांनी प्राप्त केली. राजस्थान केडरच्या रंजिता शर्मा यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू आयपीएस प्रोबेशनर म्हणून घोषित करण्यात आले. गृह राज्यमंत्र्यांनी तिला पंतप्रधान बॅटन आणि गृहमंत्री  रिव्हॉल्व्हर दिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004H0SL.jpg

तामिळनाडू कॅडरच्या श्रेया गुप्ता यांना भुवानंद मिश्रा मेमोरियल ट्रॉफी द्वितीय सर्वोत्कृष्ट अष्टपैलू प्रोबेशनरसाठी प्रदान करण्यात आली .

नेपाळ पोलिसांचे 10, रॉयल भूतान पोलिसांचे 12, मालदीव पोलीस सेवेचे 7 आणि मॉरिशस पोलीस दलाचे 5 असे एकूण 34 परदेशी प्रोबेशनर्सदेखील संचलनात सहभागी झाले होते.


* * *

S.Tupe/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1743202) Visitor Counter : 222