आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने ओलांडला 49 कोटींचा टप्पा


गेल्या 24 तासात सुमारे 58 लाख मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर 97.36%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 44,643 नवे दैनंदिन रुग्ण

देशात सध्या उपचाराधीन रुग्ण (4,14,159) एकूण रुग्णांच्या 1.30%

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.72%) दोन महिने 5% पेक्षा कमी

Posted On: 06 AUG 2021 9:29AM by PIB Mumbai

भारतात  कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 49 कोटींचा महत्वपूर्ण टप्पा काल ओलांडला. आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 57,64,712 सत्रांद्वारे 49,53,27,595 मात्रा देण्यात आल्या  आहेत. गेल्या 24 तासात 57,97,808 मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये यांचा समावेश आहे-

HCWs

1st Dose

1,03,24,101

2nd Dose

79,35,738

FLWs

1st Dose

1,80,22,988

2nd Dose

1,15,97,454

Age Group 18-44 years

1st Dose

16,97,29,527

2nd Dose

1,08,07,866

Age Group 45-59 years

1st Dose

10,99,20,377

2nd Dose

4,15,01,902

Over 60 years

1st Dose

7,76,34,057

2nd Dose

3,78,53,585

Total

49,53,27,595



21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,10,15,844 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 41,096 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 97.36%.आहे.


गेल्या 24 तासात 44,643 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

सलग 40 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,14,159 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.30%  आहेत.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ करत देशात गेल्या 24 तासात 16,40,287 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 47.65  कोटीहून अधिक (47,65,33,650) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.41% आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर आज 2.72% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर सलग 60 दिवस 5% पेक्षा कमी आहे.

***


STupe/NC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1743084) Visitor Counter : 236