युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

एनसीएसएसआर योजनेअंतर्गत क्रीडा विज्ञान विभाग आणि क्रीडा औषध विभाग स्थापन करण्यासाठी सहा विद्यापीठे/संस्था आणि पाच वैद्यकीय महाविद्यालयांची निवड करण्यात आली आहे : केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर

Posted On: 05 AUG 2021 4:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021

ठळक वैशिष्ट्ये :

  • या योजनेची उद्दिष्टे भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि निवडक विद्यापीठे/संस्था/वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे देशभर लागू केली जातात आणि योजनेच्या स्थापनेपासून 62.61 कोटी रुपयांची निव्वळ रक्कम जारी करण्यात आली आहे.

युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्रीडा विज्ञान आणि संशोधन केंद्राच्या (NCSSR) योजनेचा उद्देश प्रमुख खेळाडूंच्या उच्च कामगिरीच्या संदर्भात उच्च स्तरीय संशोधन, शिक्षण आणि नावीन्यतेला सहाय्य करणे हे  आहे. या योजनेचे दोन घटक आहेत: (i) एनसीएसएसआर केंद्राची स्थापना आणि (ii)  निवडक विद्यापीठे/संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये क्रीडा विज्ञान विभाग आणि क्रीडा औषध विभाग स्थापन करण्यासाठी सहाय्य (निधी) पुरवणे. या योजनेची उद्दिष्टे भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि निवडक विद्यापीठे/संस्था/वैद्यकीय महाविद्यालयांद्वारे देशभर लागू केली जातात आणि योजनेच्या स्थापनेपासून 62.61 कोटी रुपयांची निव्वळ रक्कम जारी करण्यात आली आहे. निधी राज्यनिहाय मंजूर/जारी केला जात नाही.

एनसीएसएसआर योजनेअंतर्गत क्रीडा विज्ञान विभाग आणि क्रीडा औषध विभाग स्थापन करण्यासाठी सहा  विद्यापीठे/संस्था आणि पाच वैद्यकीय महाविद्यालये निवडण्यात आली आहेत.

एनसीएसएसआर योजनेद्वारे दिलेल्या मदतीव्यतिरिक्त, या मंत्रालयाने टार्गेटेड ऑलिम्पिक पोडियम स्कीम (टीओपीएस) अंतर्गत प्रमुख खेळाडूंसाठी संशोधन-आधारित निवड निकष स्वीकारले आहेत, ज्यात वर्तमान कामगिरी, यापूर्वीची कामगिरी, तुलनात्मक डेटा, जागतिक विश्लेषण, प्रगती दर यांचा समावेश आहे.  तसेच, खेळाडूंच्या प्रगतीसाठी वैज्ञानिकदृष्ट्या निर्धारित निकषांनुसार त्यांच्या कामगिरीवर नियमित देखरेख ठेवली जाते. शिवाय राष्ट्रीय क्रीडा विकास निधी अंतर्गत, हे मंत्रालय टॉप्स कोर ग्रुप आणि डेव्हलपमेंटल ग्रुपमध्ये निवडलेल्या खेळाडूंच्या प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी साईला अनुदान देते.   

युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1742777) Visitor Counter : 299