रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वाहन उत्पादकांशी चर्चा, इंधन-लवचिक वाहने लवकरात लवकर काढण्यावर बैठकीत भर

प्रविष्टि तिथि: 03 AUG 2021 5:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2021

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी यांनी आज भारतीय वाहन उत्पादक सोसायटीच्या कार्यकारी प्रमुखांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. यात, खाजगी, व्यावसायिक गाड्या तसेच दुचाकी वाहनांच्या उत्पादकांचा समावेश होता.

या प्रतिनिधी मंडळाने वाहन उद्योगाची सद्यस्थिति सांगणारे सादरीकरण केले तसेच, BS-6- टप्पा दूसरा, CAFÈ-टप्पा दूसरा, अशा उत्सर्जन आधारित नियमनांची अंमलबजावणी पुढे ढकलावी अशी विनंती केली. तसेच, दुचाकी वाहनांसाठीचे OBD नियमन देखील पुढे ढकलावे, असे त्यांनी गडकरी यांना सांगितले. या बैठकीत, गडकरी यांनी सर्व वाहन उत्पादकांना फ्लेक्स्- फ्यूएल म्हणजेच, इंधनाच्या दृष्टीने लवचिक म्हणजेच 100 टक्के  इथेनॉल आणि गॅसोलीन वर चालणाऱ्या गाड्या लवकरात लवकर म्हणजेच, एका वर्षात भारतीय बाजारात आणाव्यात, अशी आग्रही सूचना केली. ब्राझील आणि अमेरिकेत हे तंत्रज्ञान यशस्वी झाले असून तिथल्या तयार तंत्रज्ञानाच्या मदतीने गाड्यांचे उत्पादन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

वाहन- अभियांत्रिकीच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल गडकरी यांनी OEMs चे अभिनंदन केले. तसेच, चार चाकी वाहनांच्या सर्व श्रेणीत तसेच, प्रकारात, किमान सहा एअरबॅग्स निश्चित उपलब्ध करुन द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते अत्यंत आवश्यक असल्याचे गडकरी म्हणाले

या सोसायटीने दिलेल्या निवेदनावर विचार सुरु असून, त्याबद्दलची आणखी एक बैठक येत्या पंधरवड्यात होऊ शकेल.

 


S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1741909) आगंतुक पटल : 304
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Malayalam