आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविडनंतर उद्‌भवणाऱ्या आजारांवरील अभ्यास

Posted On: 03 AUG 2021 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2021

 

आरोग्य संशोधन विभागाअंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) कोविड -19 चे वैद्यकीय उपचार आणि त्याआधारे येणारे निष्कर्ष  प्राप्त करण्यासाठी  देशभरातील 20 केंद्रांवर कोविड क्लिनिकल रजिस्ट्री अर्थात निष्कर्ष नोंदणी सुरु केली आहे. ही माहिती केवळ रुग्णालयात दाखल रुग्णांसाठीच  मर्यादित आहे. महाधमनी आणि फुफ्फुसाचा दाह, म्यूकरमायकोसिस इत्यादी कोविड बाधित रुग्णांना कोविडनंतर होणाऱ्या आजारांचा   विविध परिस्थितीचा  अभ्यास केला जात आहे. आरोग्य हा राज्याचा विषय असला तरी, केंद्र सरकारने राज्यांना सल्ला दिला आहे की , त्यांनी कोविडनंतर उद्‌भवणाऱ्या विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने, त्यांच्याशी  संबंधित योग्य आरोग्य सुविधा त्यांना उपलब्ध करून  देण्यासाठी कोविडोत्तर  दवाखान्याची  स्थापना करावी.

तसेच, विविध कोविडोत्तर शारीरिक  परिस्थिती/समस्यांशी संबंधित  विशेष घटक  /मार्गदर्शक तत्त्वांवर तज्ज्ञ गट काम करत आहेत.

राज्यमंत्री (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय), डॉ.भारती प्रविण पवार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1741868) Visitor Counter : 180