आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अद्ययावत माहिती


राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या 49.85 कोटींपेक्षा जास्त मात्रांचा पुरवठा

लसीकरणासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे 2.75 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रा वापरासाठी अद्यापही उपलब्ध

Posted On: 03 AUG 2021 9:37AM by PIB Mumbai

देशभरात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्याला 21 जून, 2021 पासून सुरुवात झाली.  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लसींची अधिक उपलब्धता, लसींच्या साठ्याविषयी आगाऊ सूचना आणि लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करणे या माध्यमातून लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यात आली आहे.

 

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना  कोविड प्रतिबंधक लसीचा पुरवठा विनामूल्य करत आहे. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित  75% लस खरेदी करून या लसीचा राज्ये  व केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य ) पुरवठा करेल.

 

VACCINE DOSES

 

(As on 3 August 2021)

 

SUPPLIED

 

49,85,51,660

 

IN PIPELINE

 

20,94,890

 

CONSUMPTION

 

47,52,49,554

 

BALANCE AVAILABLE

 

 

2,75,88,573

सर्व स्त्रोतांद्वारे राज्य/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसीच्या 49.85 कोटींहून अधिक (49,85,51,660) मात्रा पुरविण्यात आल्या आहेत आणि आणखी 20,94,890 मात्रा उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत.

यापैकी अपव्यय झालेल्या मात्रांसह एकूण 47,52,49,554 मात्रांचा वापर करण्यात आला आहे(आज सकाळी 8 वाजता उपलब्ध माहितीनुसार)


राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 2.75 कोटींपेक्षा जास्त  (2,75,88,573) मात्रा लसीकरणासाठी शिल्लक आहेत.

***

STupe/SChavan/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1741774) Visitor Counter : 205