पर्यटन मंत्रालय

पर्यटन मंत्रालयाने इको टुरिझमची देशातील विकासासाठी एक विशिष्ट पर्यटन क्षेत्र म्हणून निवड केली आहे: जी. किशन रेड्डी

Posted On: 02 AUG 2021 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2021

 

मुख्य ठळक मुद्दे:

  • स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत विकासासाठी इको सर्किट आणि वन्यजीव सर्किटसह पंधरा थीमॅटिक सर्किटची निवड
  • पर्यटन मंत्रालयाने इको टूरिझमवर लक्ष केंद्रित करून शाश्वत पर्यटनासाठी मसुदा राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखडा  तयार केला आहे

पर्यटन मंत्रालयाने इको टुरिझमला देशातील विकासासाठी एक विशिष्ट पर्यटन क्षेत्र म्हणून निवड केली आहे.

शाश्वत पर्यटनामध्ये शाश्वत उपजीविकेचे साधन बनण्याची आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अफाट क्षमता आहे हे पर्यटन मंत्रालयाने ओळखले आहे. पर्यटन मंत्रालयाने इको टूरिझमवर लक्ष केंद्रित करून शाश्वत पर्यटनासाठी मसुदा राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखडा  तयार केला आहे.

पर्यटन मंत्रालय आपल्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत देशात संकल्पनेवर आधारित पर्यटन सर्किट विकसित करत आहे. या योजनेअंतर्गत विकासासाठी निवडलेल्या पंधरा थीमॅटिक सर्किटमध्ये इको सर्किट आणि वन्यजीव सर्किट यांचा समावेश आहे. स्वदेश दर्शन योजनेचा उद्देश स्थानिक समुदायांच्या सक्रिय सहभागाद्वारे रोजगार निर्मिती करणे आणि समुदाय आधारित विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या दृष्टीने पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा आहे. या  योजनेअंतर्गत विकास प्रकल्पांची निवड राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाशी सल्लामसलत करून केली आहे आणि निधीची उपलब्धता, योग्य तपशीलवार प्रकल्प अहवाल सादर करणे, योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन  आणि पूर्वी जारी केलेल्या निधीचा वापर केला असल्यास  मंजूर केले जातात .

पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1741510) Visitor Counter : 247