आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणात भारताने एकूण 47 कोटींचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 60 लाखांपेक्षा अधिक लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या

सध्याचा रोगमुक्तीचा दर 97.36 %

गेल्या 24 तासात 41,831 दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या (4,10,952) सध्या एकूण बाधितांच्या संख्येच्या 1.30 %

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.34 %), गेले सलग 55 दिवस 5% पेक्षा कमी राहिला आहे.

Posted On: 01 AUG 2021 10:15AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 1 ऑगस्ट 2021

भारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने काल 47 कोटींचा महत्त्वाचा टप्पा पार केला. आज सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, आतापर्यंत 55,71,565 सत्रांद्वारे कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 47,02,98,596 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात लसीच्या 60,15,842 मात्रा देण्यात आल्या.

दिल्या गेलेल्या मात्रांची आकडेवारी पुढे समाविष्ट केली आहे –

HCWs

1st Dose

1,03,10,569

2nd Dose

78,48,198

FLWs

1st Dose

1,79,76,013

2nd Dose

1,13,28,258

Age Group 18-44 years

1st Dose

15,61,40,811

2nd Dose

86,68,370

Age Group 45-59 years

1st Dose

10,63,39,854

2nd Dose

3,91,28,126

Over 60 years

1st Dose

7,60,38,913

2nd Dose

3,65,19,484

Total

47,02,98,596

 

 

कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्प्याला देशामध्ये 21 जून 2021 पासून प्रारंभ झाला. संपूर्ण देशभरात लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे आणि त्याची व्याप्ती विस्तारित करणे यासाठी केंद्रसरकार कटिबद्ध आहे.

देशात महामारीच्या प्रारंभीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,08,20,521 व्यक्ती यापूर्वीच कोविड – 19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. आणि गेल्या 24 तासात 39,258 रुग्ण कोविडमधून बरे झाले. यामुळे एकूण रोगमुक्ती दर आता 97.36 % इतका झाला आहे.

 

गेल्या 24 तासात भारतात 41,831 दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

रोज नोंद होत असलेल्या नवीन कोविड बाधित रुग्णांची संख्या गेले सलग 35 दिवस 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या अखंडित आणि संयुक्तपणे करण्यात आलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,10,952 इतकी आहे आणि देशातील सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.30 % इतके आहे.

 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासात देशात एकूण 17,89,472 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या अगदी सुरवातीपासून आतापर्यंत देशात 46.82 कोटींहून अधिक (46,82,16,510) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

देशभरात एका बाजूला चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.42 % आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 2.34 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सलग 55 दिवस 5% पेक्षा कमी राहिला आहे

***

MC/SeemaS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1741239) Visitor Counter : 275