पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
28 JUL 2021 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2021
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी भेट घेतली.
परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन यांनी राष्ट्राध्यक्ष बायडन आणि उपाध्यक्ष हॅरिस यांच्या वतीने पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. या भेटीपूर्वी त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी केलेल्या फलदायी देवाणघेवाणीविषयी पंतप्रधानांना माहिती दिली आणि संरक्षण, सागरी सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, हवामान बदल आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात भारत अमेरिका दरम्यानचे धोरणात्मक संबंध आणखी मजबूत करण्याची दृढ वचनबद्धता व्यक्त केली.

पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष बायडन आणि उपाध्यक्ष हॅरिस यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कोविड -19 विरुद्ध लढा आणि हवामान बदलाशी संबंधित राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी घेतलेल्या पुढाकारांबद्दल कौतुक केले.
परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात विविध द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्यांवरील वाढते एकमत आणि या त्याला ठोस आणि व्यावहारिक सहकार्यात रूपांतरित करण्यासाठी उभयपक्षी धोरणात्मक भागीदारीच्या बांधिलकीचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अमेरिका आणि भारत येथील समाज लोकशाही, स्वातंत्र्य आणि मुक्तता या मूल्यांविषयी सखोल प्रतिबद्धता दर्शवितात आणि अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांनी द्विपक्षीय संबंध वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की कोविड -19 मुळे निर्माण झालेली आव्हाने, जागतिक आर्थिक पुनर्प्राप्ती आणि हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही वर्षांत भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी जागतिक पातळीवर अधिक महत्त्वपूर्ण ठरेल.
M.Chopade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1740107)
आगंतुक पटल : 601
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam