गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जून 2021 पर्यंत 2,734 प्रकल्प पूर्ण

Posted On: 28 JUL 2021 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जुलै 2021

स्मार्ट सिटी मिशन ही योजना जानेवारी 2016 ते 28 जून 2018 या कालावधीत राबवण्यात आली. चार फेऱ्यांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धांतून निवडलेल्या 100 शहरांमध्ये ही योजना राबवण्यात आली.

30 जून 2021 रोजी या शहरांतील 5,956 प्रकल्पांसाठी रु 1,79,413 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या, त्यापैकी 1,48,029 कोटींच्या 5,314 प्रकल्पांच्या कामाला सुरुवात झाली त्यापैकी 46,769 कोटींचे 2734 प्रकल्प पूर्ण झाले.

राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना त्या-त्या प्रदेशातील  स्मार्ट शहरांसाठी जून 2021 मध्ये केंद्र सरकारने 23 हजार 925 कोटी  दिले.

जानेवारी 2016 च्या पहिल्या फेरीतील वीस स्मार्ट सिटीं मधील प्रकल्प कोणत्या स्तरावर आहेत त्याची अद्ययावत माहिती खाली दिली आहे.

(Amount in ₹crore)

Smart City

Tender Stage

Work Order Stage

Work Completed

Total Projects

Total Amount

No. of Projects

Amount

No. of Projects

Amount

No. of Projects

Amount

Round 1 Cities

(20 cities)

127

11,750

548

26,966

1,119

18,408

1,794

57,124

(SCM Geo-Spatial Management Information System,30 June, 2021)

पहिल्या फेरीत निवडल्या गेलेल्या स्मार्ट सिटींसाठी असलेल्या 57,124 कोटी रुपयांच्या 1,794 प्रकल्पांपैकी, 45,374कोटी खर्चाचे (79%) 1,667 (93 टक्के) प्रकल्प पूर्ण झाले आहेत किंवा पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. हे सर्व स्मार्ट शहरांमधील प्रकल्प वेळेवर पूर्ण व्हावेत म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

केंद्रीय गृह व शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल  किशोर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739919) Visitor Counter : 182