राष्ट्रपती कार्यालय
खराब हवामानामुळे राष्ट्रपतींची कारगिल युद्ध स्मारकाची नियोजित भेट रद्द.
बारामुल्ला येथील डग्गर युद्ध स्मारकस्थळी राष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली
Posted On:
26 JUL 2021 9:57PM by PIB Mumbai
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊ शकले नाहीत. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला रस्ता बदलणे भाग पडल्यामुळे राष्ट्रपतींना स्मारकाची नियोजित भेट रद्द करावी लागली.
त्याऐवजी, राष्ट्रपतींनी बारामुल्ला येथील डग्गर युद्ध स्मारकाला भेट देऊन देशाच्या संरक्षणार्थ प्राणाचे बलिदान केलेल्या सैनिकांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
तेथील चिनार छावणीतील अधिकारी आणि जवानांशीही त्यांनी संवाद साधला. त्याशिवाय गुलमर्ग येथील उंचावरील सैनिकी शाळेलाही त्यांनी भेट दिली.
*****
Jaydevi PS/VS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1739374)
Visitor Counter : 184