PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 26 JUL 2021 8:42PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई 26 जुलै 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 43.51 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 3,05,79,106total recoveries across the country so far
  • Recovery Rate currently at 97.35%
  • 35,968patients recovered during last 24 hours
  • India reports 39,361new cases in last 24 hours
  • India's Active Caseload currently at 4,11,189
  • Active cases constitute 1.31% of total cases
  • Weekly Positivity Rate remainsbelow5%, currently at 2.31%
  • Daily positivity rate at 3.41%, remains below 5%
  • Testing capacity substantially ramped up – 45.74crore tests conducted(Total)

#Unite2FightCorona#IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

Image

Image

Image

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

भारतातील लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने काल 43 कोटी 51 लाखांचा आकडा पार केला. आज सकाळी 8 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 52,95,458 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 43,51,96,001 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 18,99,874 मात्रा देण्यात आल्या.

दिल्या गेलेल्या एकूण मात्रांमध्ये खालील मात्रांचा समावेश आहे:

HCWs

1st Dose

1,02,87,343

2nd Dose

77,06,397

FLWs

1st Dose

1,78,56,000

2nd Dose

1,08,45,879

Age Group 18-44 years

1st Dose

13,91,72,057

2nd Dose

62,18,541

Age Group 45-59 years

1st Dose

10,09,68,508

2nd Dose

3,45,89,799

Over 60 years

1st Dose

7,35,18,799

2nd Dose

3,40,32,678

Total

43,51,96,001

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु करण्यात आला. देशभरातील लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,05,79,106 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 35,968 रुग्ण बरे झाले. यामुळे सकल रोगमुक्ती दर 97.35% झाला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00189HT.jpg

गेल्या 24 तासांत भारतात, 39,361 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग एकोणतीस दिवस, 50,000 हून कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या अखंडित आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002F0QF.jpg

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,11,189 इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.31% इतके आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003Y98R.jpg

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 11,54,444 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 45 कोटी 74 लाखांहून जास्त (45,74,44,011) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात एका बाजूला चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.31% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 3.41% इतका आहे. सलग 49 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

 

इतर अपडेटस्

 

महाराष्ट्र अपडेट्स :-

महाराष्ट्रात रविवारी 6,843 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आणि 123 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 62,64,922 झाली असून बळींची संख्या 1,31,552 झाली आहे. आज दिवसभरात 5,212 रुग्णांना उपचारानंतर रोगमुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सध्या 60,35,029 इतकी असून सध्या राज्यात 94,985 कोविड सक्रीय रुग्ण उपचाराधीन आहेत.

 

गोवा अपडेट्‌स:-

शनिवारी गोवा राज्यात कोविडमुळे एकही मृत्यू झाला नाही. मात्र रविवारी राज्यात सहा जणांना कोविडमुळे प्राण गमवावे लागले. रविवारी दिवसभरात 75 नव्या कोविड बाधितांची नोंद झाल्यानंतर गोव्यातील एकूण कोविड ग्रस्तांची आकडेवारी 1,70,491 पर्यंत पोहोचली आहे तर कोविड बळींची संख्या 6 ने वाढून 3,132 झाली आहे. रविवारी रुग्णालयातून 149 व्यक्तींना घरी सोडण्यात आल्यामुळे आता राज्यात 1,158 कोविड सक्रीय रुग्ण उपचाराधीन आहेत.

Important Tweets

 

***

M.Chopade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1739285) अभ्यागत कक्ष : 186