आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 लसीकरण-अद्ययावत माहिती
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत कोविड लसींच्या 45.73 कोटींपेक्षा अधिक मात्रा वितरीत
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह खाजगी रूग्णालयांकडे अद्याप 3.09 कोटी लसींच्या मात्रा शिल्लक
Posted On:
26 JUL 2021 9:27AM by PIB Mumbai
देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. कोविड सार्वत्रिक लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 21 जून 2021 रोजी सुरु झाला आहे. लसींची अधिक उपलब्धता, उपलब्ध होणाऱ्या लसींच्या साठ्याविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगावू सूचना देणे तसेच त्याद्वारे लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करण्याचा प्रयत्न करत, लसीकरण मोहीमेला गती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत कोविड लसी पुरवत आहे. लसीकरणाच्या सध्या सुरु असलेल्या टप्प्यात, केंद्र सरकार देशात उत्पादित होणाऱ्या 75% लसी खरेदी करणार असून, त्यांचा मोफत पुरवठा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना करणार आहे.
VACCINE DOSES
|
(As on 26 July 2021)
|
SUPPLIED
|
45,37,70,580
|
IN PIPELINE
|
59,39,010
|
CONSUMPTION
|
42,28,59,270
|
BALANCE AVAILABLE
|
3,09,11,310
|
आतापर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 45.37 कोटींपेक्षा अधिक (45,37,70,580) लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. तसेच, आणखी 59,39,010 मात्रा पुरवठा प्रक्रियेत आहेत.
यापैकी, एकूण 42,28,59,270 मात्रांचा वापर करण्यात आला आहे. (वाया गेलेल्या लसींच्या मात्रांसह, सकाळी आठ वाजेपर्यंतच्या प्राप्त झालेल्या माहितीनुसार)
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसह खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 3.09 कोटींपेक्षा जास्त (3,09,11,310) लसींच्या मात्रा शिल्लक आहेत.
***
STupe/SampadaP /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738949)
Visitor Counter : 281