महिला आणि बालविकास मंत्रालय
हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री देशभरात सुरू करणार 24/7 हेल्पलाइन
हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी तक्रार व समुपदेशन सेवा हे नव्याने सुरु होणाऱ्या हेल्पलाईनचे उद्दिष्ट
Posted On:
26 JUL 2021 10:37PM by PIB Mumbai
केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी 27 जुलै 2021 पासून देशभरात 24/7 हेल्पलाइन सुरू करणार. हिंसाचारग्रस्त स्त्रियांसाठी तातडीच्या तसेच तातडीच्या नसलेल्या प्रकरणांसाठीही तक्रार निवारणासाठी मदत उपलब्ध करून देणे व समुपदेशन सेवा पुरवणे हे या हेल्पलाईन सेवेचे उद्दीष्ट असेल. हिंसाचारग्रस्त स्त्रियांना पोलीस, रुग्णालय, जिल्हा पातळीवरील कायदेविषयक सेवा अधिकारी, मानसोपचार सेवा अश्या सहाय्यक सेवा तसेच सरकारचे महिलाकेंद्री कार्यक्रम यांची व्यवस्थित ओळख करून देणारी सेवा संपूर्ण देशभरात एकमेव हेल्पलाईन क्रमांकाद्वारे उपलब्ध होईल. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या अनेक धोरणांप्रमाणे महिला सुरक्षा ही बाब या हेल्पलाईनच्या प्राधान्यक्रमावर असेल.
राष्ट्रीय महिला आयोग, धोरणानुसार महिलांच्या बाबतीतील हिंसाचार व महिलाहक्क उल्लंघनाची विविध प्रकरणे हाताळते. या संबधीच्या तक्रारी www.ncw.nic.in. या संकेतस्थळावर लेखी वा ऑनलाईन नोंदवता येतात. तक्रारीची सुयोग्य तड लावण्यासंदर्भात महिलांना आश्वस्त करत आयोग या स्त्रियांना तातडीचे, महत्वपूर्ण सहकार्य करतो.
***
M.Chopade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1739284)