सांस्कृतिक मंत्रालय

भारतातील 39 व्या स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता


तेलंगणामधील, वारंगलजवळील येथील रुद्रेश्वर म्हणजेच रामप्पा मंदिराचा जागतिक वारसा स्थळा यादीत समावेश

Posted On: 25 JUL 2021 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2021

 

अजून एक महत्त्वपूर्ण लक्ष्य साध्य करत, भारतामधील रुद्रेश्वर मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यात असलेल्या पालमपेठमधील हे मंदिर रामाप्पा मंदिर या नावानेही ओळखले जाते.

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 44 व्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला.

 

रामप्पा मंदिर हे तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारे एक विशेष अद्भुत आहे. मंदिराच्या वास्तुविशारदाच्या नावावरून ते  रामाप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील समावेशासाठी वर्ष 2019 मध्ये भारत सरकारतर्फे या एकमेव स्थळाचा नामनिर्देश केला गेला होता.

 

“जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नुकताच भारतातील तेलंगणाच्या काकतीया रुद्रेश्वर म्हणजेच रामाप्पा मंदिराचा समावेश. ब्राव्हो!!”  असे ट्विट करत युनेस्कोने ही घोषणा केली.

 

तेलंगणा राज्यातील वारंगळजवळील मालुगू जिल्ह्यातल्या पालमपेठ येथील रामप्पा मंदिर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रुद्रेश्वर मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून संयुक्त राष्ट्र शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था म्हणजेच युनेस्कोने मान्यता दिली, यासंदर्भात मार्गदर्शन तसेच सहकार्य दिल्याबद्दल केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि इशान्य प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार आले आहेत.

रेड्डी यांनी भारतीय सर्वेक्षण विभाग तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचेही आभार मानले आहेत.

Image  Image

Image

 

* * *

S.Thakur/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1738904) Visitor Counter : 5874