आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 42.78 कोटींचा टप्पा


रुग्ण बरे होण्याचा दर 97.35% वर स्थिर

गेल्या 24 तासात 39,097 नव्या रुग्णांची नोंद

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या (4,08,977) सध्या एकूण रुग्णसंख्येच्या केवळ 1.31%

सलग 33 व्या दिवशी दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर (2.40%) 3% पेक्षा कमी

Posted On: 24 JUL 2021 2:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जुलै 2021

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 42.78 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार एकूण 52,34,188 सत्रांमध्ये, 42,78,82,261 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 42,67,799 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

यात समावेश आहे :

HCWs

1st Dose

1,02,83,491

2nd Dose

76,74,804

FLWs

1st Dose

1,78,44,127

2nd Dose

1,07,32,410

Age Group 18-44 years

1st Dose

13,54,32,522

2nd Dose

57,68,314

Age Group 45-59 years

1st Dose

10,00,94,927

2nd Dose

3,34,30,580

Over 60 years

1st Dose

7,31,64,749

2nd Dose

3,34,56,337

Total

42,78,82,261

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 3,05,03,166 तर गेल्या 24 तासात 35,087 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर 97.35% झाला आहे.

भारतात गेल्या 24 तासात 39,097 नव्या रुग्णांची नोंद झाली.

सलग 27 दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे.

भारतात सक्रीय रुग्णसंख्येतही सातत्याने घट होत आहे. देशात आज सक्रीय रुग्णसंख्या 4,08,977 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1.31% आहे.

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 16,31,266 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 45.45 कोटींपेक्षा अधिक (45,45,70,811) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहीक पॉझिटीव्हीटी 2.22% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी 2.40% आहे. दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर सलग 33 व्या दिवशी 3% पेक्षा कमी तर साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दर सलग 47 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738526) Visitor Counter : 223