संरक्षण मंत्रालय

रशियात 20 जुलै 2021 ला होणाऱ्या माक्स हवाई कसरतीमध्ये सारंग हेलिकॉप्टर सहभागी होणार

Posted On: 20 JUL 2021 5:20PM by PIB Mumbai

 

रशियातील झुकोव्ह्स्की आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात होणाऱ्या माक्स आंतरराष्ट्रीय हवाई कसरतींमध्ये पहिल्यांदा सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाचा सारंग हेलिकॉप्टर प्रदर्शन संघ जय्यत तयार आहे. रशियातील हे प्रदर्शन द्वैवार्षिक स्वरूपाचे असून या वर्षी 20 जुलै 2021 ते 25 जुलै 2021 या कालावधीत होणार आहे.

सारंग हेलिकॉप्टर्सच्या या प्रदर्शनातील कामगिरीची ही पहिलीच वेळ आहे. रशियातील या हवाई कसरतींमध्ये सारंग संघातील 4 हेलिकॉप्टर्स भाग घेणार असून भारतात निर्मित ध्रुव हे  हलक्या वजनाचे आधुनिक हेलिकॉप्टरदेखील सहभागी असेल. HAL कंपनीने निर्माण केलेली ही हेलिकॉप्टर्स हिंजलेस रोटर्स असलेली आहेत आणि अत्यंत कौशल्यपूर्ण हवाई तंत्रज्ञान वापरून निर्माण केलेली असल्याने लष्कराच्या हवाई उपयोगासाठी ती अत्यंत योग्य आहेत. भरतील हवाई सेनेसह भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल देखील या प्रकारच्या हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहेत.

सारंग हेलिकॉप्टर्सच्या संघाची स्थापना 2003 मध्ये बेंगळूरू येथे करण्यात आली आणि या संघाचा पहिला आंतरराष्ट्रीय अविष्कार सिंगापूर येथे 2004 मध्ये झालेल्या आशियायी हवाई कसरतींमध्ये दाखविण्यात आला.  आतापर्यंत संयुक्त अरब अमिरात, बहारीन, मॉरीशस आणि श्रीलंका येथे झालेल्या हवाई कसरती तसेच विशेष प्रसंगीच्या उत्सवी प्रदर्शनात सारंगने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ठिकाणी हवाई कसरतींचे कौशल्य दाखविण्यासोबतच, सारंगच्या पथकाने उत्तराखंडातील राहत अभियान (2013),  केरळमधील ओखी चक्रीवादळ (2017)  तसेच केरळमधील करुणा पूरग्रस्त मदत अभियान (2018) यासारख्या अनेक मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण अभियानांमध्ये सक्रीयतेने भाग घेतला आहे.

***

M.Iyengar/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1737254) Visitor Counter : 231