शिक्षण मंत्रालय

ऑक्सिजनचा नियंत्रित पुरवठा  करणारे, एम्लेक्स हे  अशा  प्रकारचे पहिले उपकरण आयआयटी रोपारद्वारा  विकसित

Posted On: 20 JUL 2021 3:35PM by PIB Mumbai

 

वैद्यकीय ऑक्सिजनच्या सिलिंडर्सचे आयुष्य तीन पटीने वाढविण्याच्यादृष्टीने , रुग्णांना श्वास घेताना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवणारे आणि उश्वासाद्वारे  कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडत असताना ऑक्सिजन पुरवठा रोखणारे अर्थात ऑक्सिजनचा  नियंत्रित पुरवठा  करणारे, एम्लेक्स हे  अशा  प्रकारचे पहिले उपकरण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रोपार ने विकसित केले आहे. या प्रक्रियेमुळे  ऑक्सिजनची बचत होते.

आतापर्यंत, श्वासोच्छ्वासाच्या दरम्यान, ऑक्सिजन सिलेंडर / पाईपमधील ऑक्सिजन वापरकरता श्वास सोडत असताना कार्बन डाय ऑक्साईड सोबत बाहेर ढकलला जात असे. यामुळे दीर्घ कालावधीत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा अपव्यय होत असे. कोविड -19 च्या दुसर्‍या लाटेच्या वेळी  आपण पाहिले आहे,की वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी अनेक पटींनी वाढली होती. या उपकरणामुळे या ऑक्सिजनचे अशा प्रकारे अनावश्यक रितीने  मोफत जाणे थांबविण्यास मदत होईल.

आयआयटी रोपार येथील जैववैद्यकीय अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. आशिष सहानी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या जैववैद्यकीय अभियांत्रिकी विभागाच्या पीएचडीचे  विद्यार्थी मोहित कुमार, रविंद्र कुमार आणि अमनप्रीत चंदर यांनी हे उपकरण विकसित केले आहे.

यासंदर्भात बोलताना डॉ. सहानी म्हणाले,विशेष करून ऑक्सिजन सिलिंडरसाठीच तयार केलेले, एएमएलएक्स सहजपणे ऑक्सिजन पुरवठ्याची लाइन आणि रूग्णाच्या तोंडावरील मास्क याच्याशी जोडले जाऊ शकते. यात सेन्सर चा वापर करण्यात आला असून तो सेन्सर कोणत्याही पर्यावरणीय स्थितीत वापरकर्त्याचा श्वास आणि उच्छ्वास यातील फरक यशस्वीरित्या ओळखू  शकते,. हे साधन व्यावसायिकरित्या उपलब्ध कोणत्याही ऑक्सिजन थेरपी आणि मास्क यांच्या बरोबर कार्य करू शकते.

लुधियाना येथील दयानंद वैद्यकीय महाविद्यालयाच्या संशोधन आणि  विकास विभागाचे संचालक डॉ. जीएस वांडेर ,या उपक्रमाचे कौतुक करतांना म्हणाले, की अनेक रुग्णालये ऑक्सिजनची उत्पादन क्षमता वाढवत असले  तरी, अशा उपकरणामुळे ग्रामीण आणि  निमशहरी छोट्या  वैद्यकीय केंद्रांमधील ऑक्सिजनचा वापर नियंत्रित करण्यास मोठी मदत होऊ शकते.

 

***

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1737175) Visitor Counter : 291