ऊर्जा मंत्रालय

ऊर्जा उपकरणे उत्पादन योजना

Posted On: 20 JUL 2021 3:24PM by PIB Mumbai

 

ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा उपकरणांसंदर्भात आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमास चालना देण्यासाठी ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा उपकरणांसाठी उत्पादन क्षेत्रे स्थापन करण्याची योजना प्रस्तावित आहे.

तीन वर्षांच्या कालावधीत तीन उत्पादन क्षेत्रं उभारण्याचा प्रस्ताव आहे. सामान्य पायाभूत सुविधा (सीआयएफ) आणि सामान्य चाचणी सुविधा (सीटीएफ) स्थापित करण्याच्या उद्देशाने या उत्पादन क्षेत्रांना सहाय्य दिले जाईल. या उत्पादन क्षेत्रांसाठी निवड निकष अद्याप निश्चित झालेले नाहीत.

केंद्रीय ऊर्जा व नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Thakur/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1737171) Visitor Counter : 176


Read this release in: English , Urdu , Punjabi , Malayalam