वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताच्या अध्यक्षतेखाली आर्थिक आणि व्यापाराशी संबंधित मुद्द्यांवरील ब्रिक्स संपर्क गटाची बैठक 12 ते 14 जुलै या कालावधीत संपन्नता
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2021 10:49AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 20 जुलै 2021
ब्राझील,रशिया,भारत,चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ब्रिक्स (BRICS)गटाचे 2021 या वर्षीचे अध्यक्षपद भारत भूषवित आहे. ब्रिक्सच्या विविध विषयांवरील गटांपैकी, आर्थिक आणि व्यापाराशी संबंधित मुद्द्यांवरील संपर्क गटाकडे (CGETI) या सर्व देशांतील आर्थिक आणि व्यापारविषयक बाबींच्या कामाची जबाबदारी आहे. केंद्रीय वाणिज्य विभाग BRICS CGETIचा राष्ट्रीय समन्वयक आहे.
या वर्षी 12 ते 14 जुलै या कालावधीत CGETI ची बैठक घेण्यात आली. या तीन दिवसीय बैठकीत, आंतर-ब्रिक्स सहकार्य आणि व्यापार वृद्धी तसेच बळकटीकरणाच्या उद्देशाने, भारताने दिलेल्या खालील प्रस्तावांवर ब्रिक्स गटाच्या सदस्य देशांनी चर्चा केली:
- बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेसाठी ब्रिक्सचे सहकार्य
- ई-वाणिज्य मंचावर ग्राहक संरक्षणासाठी ब्रिक्सची चौकट
- SPS/TBT उपाययोजनांसाठी विना-शुल्क उपाय (NTM) ठराव यंत्रणा
- स्वच्छताविषयक आणि वनस्पतींच्या आरोग्याशी संबंधित(SPS) कार्यकारी यंत्रणा
- जनुकीय स्त्रोत, पारंपरिक माहिती आणि पारंपारिक सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या संरक्षणासाठी सहकार्य आराखडा
- व्यावसायिक सेवांतील सहकार्यासाठी ब्रिक्सचा आराखडा
केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली, ब्रिक्सच्या व्यापारमंत्र्यांच्या 3 सप्टेंबर 2021ला होणाऱ्या बैठकीपूर्वी भारताने दिलेल्या प्रस्तावावर पुढे कार्यवाही करून त्यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी सर्व ब्रिक्स सदस्यांनी सहमती दर्शविली.
व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील संबंध अधिक सखोल आणि बळकट करण्यासाठी भारताने प्रस्तावित केलेल्या खालील कार्यक्रमांना देखील ब्रिक्स सदस्यांनी मान्यता दिली:
- केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योग मंत्रालय 16 ते 18 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करणार असलेल्या खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या आभासी बैठकीत ब्रिक्स व्यापार जत्रेचे प्रदर्शन
- केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे 22 जुलै 2021रोजी ब्रिक्स एमएसएमई गोलमेज परिषदेचे आयोजन
- रिझर्व्ह बॅंकेतर्फे 16 जुलै 2021 आणि 13 ऑगस्ट 2021 ला सेवा आणि व्यापार सांख्यिकी या विषयावर दोन चर्चासत्रांचे आयोजन
*****
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1737128)
आगंतुक पटल : 348