सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
एमएसएमईच्या क्षमतेत विस्तार आणि वृद्धी
Posted On:
19 JUL 2021 7:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2021
ज्या एमएसएमईंमध्ये वाढण्याची आणि मोठ्या कंपन्या बनण्याची क्षमता व व्यवहार्यता आहे अशा उद्योगांना इक्विटी फंडिंग म्हणून 50,000 कोटी रुपये वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत (एसआरआय) नावाने फंड ऑफ फंड जाहीर केला आहे. या योजनेंतर्गत एकूण 50,000 कोटी रुपयांचा निधी स्थापन करण्यात येणार असून केंद्र सरकारकडून 10,000 कोटी आणि खासगी इक्विटी / व्हेंचर कॅपिटल फंडांच्या माध्यमातून 40 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. या निधीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. एमएसएमई क्षेत्राच्या पात्र उपक्रमांना वाढीव भांडवल उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे.
सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग नारायण राणे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
M.Chopade/S.Kane/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736957)
Visitor Counter : 203