रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

अवजड मोटार वाहन (HMV)चालकांचे प्रशिक्षण

Posted On: 19 JUL 2021 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2021

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2002-03 पासून चालक प्रशिक्षण केंद्रांच्या (DTIs) स्थापनेसाठी देशव्यापी योजना लागू केली आहे.12 व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात (2012-17) 17 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य आणि 10 एकर जमिनीच्या तरतुदीसह या योजनेला चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (IDTR) असे नवे नाव देण्यात आले. 12 व्या पंचवार्षिक योजनेत 5 कोटी रुपये आणि 3 एकर जमीन अशा तरतुदीसह कमी क्षमतेच्या प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्रांचा (RDTCs)  दुय्यम पातळीवरील नवा घटक अंतर्भूत करण्यात आला. 14 व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात IDTR च्या आर्थिक तरतुदीत सुधारणा करून 17 कोटी रुपयांवरून वाढवून ही तरतूद 18 कोटी 50 लाख रुपये करण्यात आली.

व्यावसायिक वाहन चालकांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देणे, रस्ते आणि पर्यावरण सुरक्षा  यांची स्थिती सुधारणे आणि रस्त्यांवरील वाहतूक सशक्त करणे या उद्देशाने वाहन चालविण्याची चाचणी देण्याचा मार्ग उपलब्ध असलेले सर्व सुविधायुक्त प्रशिक्षण केंद्र उभारणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. या संस्थांमध्ये चालणारी प्रमुख कार्ये आणि कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत

  • अवजड मोटार वाहन चालविण्यासाठी प्रारंभिक (इंडक्शन) प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करणे
  • हलके मोटार वाहन चालविण्यासाठी प्रारंभिक (इंडक्शन) प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करणे
  • खासगी चालक प्रशिक्षण केंद्रांमधील प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम घेणे
  • धोकादायक वस्तूंची सुरक्षित वाहतूक करण्यासंदर्भातील तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण
  • धोकादायक वस्तूंची सुरक्षित वाहतूक करण्यासंदर्भातील एक दिवसीय उजळणी प्रशिक्षणाचे आयोजन करणे
  • सेवेत कार्यरत असणाऱ्या चालकांसाठी उजळणी व अभिमुखता प्रशिक्षणाचे आयोजन करणे
  • विविध संघटनांतर्फे आलेल्या चालकांची चाचणी परीक्षा घेऊन निवड करणे

आतापर्यंत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मंजूर झालेल्या 31 IDTR तसेच  6 RDTC ची तपशीलवार यादी परिशिष्ट- I मध्ये दिली आहे.

वाढती द्रवरूप ऑक्सिजनची  वाहतुक आणि त्याच परिणाम म्हणून ऑक्सिजन व्यवस्थापनाचा प्रलंबित कालावधी, क्रायोजेनिक टाक्या आणि अहोरात्र परिचालनामुळे उच्च श्रम आणि घर्षण दर  यापार्श्वभूमीवर मंत्रालयाने मे 2021 मध्ये राज्यांना मोटार वाहन कायदा, 1998 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील तरतुदींची अंमलबजावणी करून धोकादायक मालाच्या वाहतुकीसाठी प्रशिक्षित चालकांची फळी निर्माण करण्याचा सल्ला दिला आहे.

परिशिष्ट – I

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजूर केलेल्या राज्यनिहाय चालक प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (IDTR) आणि प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्रांचा (RDTCs)  तपशील

Sl. No.

State

IDTR/RDTC

Location

1

ANDHRA PRADESH

IDTR

Vijayawada

2

IDTR

Dasri

3

IDTR

Kurnul

4

ASSAM

IDTR

Dispur

5

BIHAR

IDTR

Aurangabad

6

CHHATTISGARH

IDTR

Naya Raipur

7

HARYANA

IDTR

Rohtak

8

IDTR

Bhiwani

9

HIMACHAL PRADESH

IDTR

Mandi

10

IDTR

Sarkaghat

11

JAMMU AND KASHMIR

IDTR

Jammu

12

JHARKHAND

IDTR

Jamshedpur

13

KARNATAKA

IDTR

Bellary

14

KERALA

IDTR

Eddappal

15

MADHYA PRADESH

IDTR

Indore

16

IDTR

Chhindwara

17

MAHARASHTRA

IDTR

Pune

18

IDTR

Lature

19

IDTR

Nagpur

20

RDTC

Nagpur

21

RDTC

Vardha

22

RDTC

Nanded

23

RDTC

Sangli

24

MANIPUR

IDTR

Imphal

25

NAGALAND

IDTR

Dimapur

26

ODISHA

IDTR

Jajpur

27

RAJASTHAN

IDTR

Rajsamand

28

RDTC

Ajmer

29

SIKKIM

IDTR

Pakyong

30

TELANGANA

IDTR

Karimnagar

31

TRIPURA

IDTR

Agartala

32

UTTAR PRADESH

IDTR

Kanpur

33

IDTR

Rai Baraily

34

UTTARAKHAND

IDTR

Dehradun

35

DELHI

IDTR

Sarai Kale Khan

36

WEST BENGAL

IDTR

Jassore

37

RDTC

Kolkatta

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी राज्यसभेत, लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736900) Visitor Counter : 230