रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनविलेले रस्ते

Posted On: 19 JUL 2021 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2021

मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील पदपथांच्या नियमित कालावधीनंतर केल्या जाणाऱ्या नूतनीकरणाच्या आवरणामधे,तसेच 5 लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरी भागातील 50 कि.मी.च्या परिघातील  सर्व्हिस रस्त्यांच्या कामात प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर अनिवार्य केला जावा यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. इंडियन रोड्स कॉंग्रेसने (आयआरसी) रस्त्याचे काम करताना गरम बिटुमिनस मिक्स (Bituminous mix)मध्ये ठराविक प्रमाणात प्लास्टिकचा कचरा वापरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. आतापर्यंत देशात 703 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग, अशाप्रकारे प्लास्टिकच्या कचऱ्याचा ठराविक प्रमाणात वापर करून बांधले गेले आहेत. प्रकल्पांची किंमत अंदाजे साहित्य, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ यासारख्या सर्व साधनांचा विचार करुन केली जाते.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन जयराम गडकरी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1736872) Visitor Counter : 237