महिला आणि बालविकास मंत्रालय
राष्ट्रीय महिला आयोगाने ब्यूरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट बरोबर सामंजस्य करार केला
पोलिस कर्मचाऱ्यांसाठी लैंगिक संवेदनशीलता प्रशिक्षण कार्यक्रम
Posted On:
16 JUL 2021 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2021
राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) देशभरातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या लैंगिक संवेदनशीलतेसाठी पोलीस संशोधन आणि विकास संस्थेबरोबर (बीपीआर आणि डी) सामंजस्य करार केला आहे. महिपालपूर दिल्ली येथील बीपीआरडी मुख्यालयात राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, बीपीआर अँड डीचे महासंचालक व्हीएसके कौमुदी , अतिरिक्त महासंचालक नीरज सिन्हा आणि प्रशिक्षण उपमहानिरीक्षक वंदन सक्सेना यांनी या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. आयोगाचे सदस्य व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही संस्थांदरम्यान सामंजस्य करार झाला.
महिलांविषयी कायद्यांबाबत आणि धोरणांबाबत पोलिस कर्मचाऱ्यांची लैंगिक संवेदनशीलता सुनिश्चित करणे आणि महिलांविरोधात गुन्ह्यांचा तपास करताना पोलिस अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीत बदल घडवून आणणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पोलिसांवर महिला तक्रारदारांचा विश्वास निर्माण करण्याच्या हेतूने आयोग नियमितपणे पोलिस अधिकाऱ्यांसाठी लैंगिक संवेदीकरण कार्यक्रम आयोजित करत आहे. या उद्देशासाठी आयोगाने लैंगिक मुद्यांवर अधिकाऱ्यांना संवेदनशील बनविण्यासाठी आणि विशेषत: लैंगिक गुन्ह्यांच्या बाबतीत पूर्वग्रह न ठेवता प्रभावीपणे कर्तव्य बजावण्यास सक्षम बनवण्यासाठी देशभरात एक कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
प्रशिक्षण तीन ते पाच दिवसांच्या कालावधीसाठी आयोजित केले जाईल, शक्यतो निवासी स्वरूपात असेल आणि एकूण 18-24 तासांचे प्रशिक्षण असेल. यात लैंगिक समस्या, महिलांशी संबंधित कायदे, अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या भूमिकेसह उत्कृष्ट पद्धती सामायिक करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736222)
Visitor Counter : 259