पर्यटन मंत्रालय

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रशाद (PRASHAD) अंतर्गत प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण

Posted On: 15 JUL 2021 9:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील प्रशाद योजनेअंतर्गत वाराणसीचा विकास - दुसरा टप्पा या प्रकल्पांतर्गत पर्यटक सुविधा केंद्र आणि प्रशाद योजनेंतर्गत वाराणसीत नदी पर्यटन जहाज सेवेचा  विकास या प्रकल्पांतर्गत अस्सी घाट ते राजघाट पर्यंत जहाज पर्यटन सेवा कार्यान्वित करण्यासह वाराणसीमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन केले.  उत्तर प्रदेशच्या राज्यपाल  श्रीमती आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ, मंत्री श्री. नीलकंठ तिवारी आणि खासदार श्री. सुरेंद्र नारायण सिन्हा यावेळी उपस्थित होते.

प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचा आणि वारसा स्थळांचा एकात्मिक विकास करण्याच्या उद्देश्याने संपूर्णपणे भारत सरकार अनुदानित  राष्ट्रीय तीर्थक्षेत्र कायापालट आणि अध्यात्मिक, वारसास्थळ विकास अभियान मोहीम (प्रशाद) ही योजना 2014-15 मध्ये केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सुरु केली. प्रशाद योजनेंतर्गत वाराणसीचा विकास - दुसरा टप्पा या प्रकल्पाला पर्यटन मंत्रालयाने फेब्रुवारी 2018 मध्ये 44.69 कोटी रुपयांच्या खर्चासह मंजुरी दिली. या प्रकल्पाअंतर्गत  ‘पंचकोशी पथ’, ‘तीर्थक्षेत्र सुविधा केंद्र’, ‘रामेश्वर’, ‘रस्ते विकास’ आणि ‘दिशादर्शक चिन्हे’ या सुविधांचे यशस्वीरित्या राष्ट्रार्पण करण्यात आले. प्रशाद योजनेंतर्गत वाराणसीत नदी जलपर्यटन जहाजसेवेचा  विकास हा प्रकल्प पर्यटन मंत्रालयाने 10.72 कोटींच्या खर्चासह फेब्रुवारी 2018 मध्ये मंजूर केला. या प्रकल्पाअंतर्गत  प्रवासीसह जलपर्यटन जहाजसेवा ’, ‘अत्याधुनिक जेट्टी  ’, ध्वनीचित्र सेवा आणि ‘सीसीटीव्ही मार्फत  देखरेख ’ या सुविधा यशस्वीरित्या देशाला समर्पित केल्या आहेत.

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736003) Visitor Counter : 284