आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 मुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीतील कल्पित (असत्य) आणि तथ्य


कोविड -19 मृत्यूंवरील एचएमआयएस आणि सीआरएस यांच्या माहितीची तुलना करून काढलेले निष्कर्ष चुकीचे आणि अनुमानाने वर्तवलेले अंदाज आहेत.

भारतात कोविड -19 मृत्यूची नोंद करण्यासाठी एक सक्षम यंत्रणा आहे.

Posted On: 14 JUL 2021 11:24AM by PIB Mumbai

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या(HMIS) आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणेच्या (एचएमआयएस) आकडेवारीच्या आधारे कोविड -19  मुळे अधिक संख्येने झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीच्या अंदाजाची नोंद  करणारे  काही वृत्तांत माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या वृत्तांतात नागरी नोंदणी प्रणाली (सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम ,सीआरएस) आणि एचएमआयएस यामधील माहितीची  तुलना, चुकीचे अनुमान काढण्यासाठी करण्यात आली आहे. असे तर्क आणि अनुमान यांना कोणताही ठोस आधार नाही.  

एचएमआयएसमध्ये झालेल्या मृत्यूची नोंद करत, या वृत्तांमध्ये असेही म्हटले आहे,की “इतर माहिती उपलब्ध नसतानाही, या सर्व  मृत्यूंना कोविड -19 चे मृत्यू असेच मानले पाहिजे”. माध्यमांतील वृत्तांनुसार 2,50,000 हून अधिक मृत्यूंचे कारण अज्ञात आहे. कोणत्याही ठोस माहितीच्या आधाराशिवाय कोविड -19 हे,या मृत्यूंचे कारण समजणे हे पूर्णतः तर्कदुष्ट आहे आणि असे अनुमान हा केवळ कल्पनाशक्तीच्या आधारे वर्तवलेला अंदाज आहे.

कोविड माहिती  व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून  केंद्र सरकार पारदर्शक आहे आणि कोविड -19  संबंधित सर्व मृत्यूची नोंद ठेवण्याची एक सशक्त यंत्रणा सरकारकडे अस्तित्त्वात आहे, याचा पुनरुच्चार सरकार करत आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या विशिष्ट प्रणालीद्वारे ही  माहिती, सतत अद्ययावत करण्याची जबाबदारी देखील सोपविण्यात आली आहे. मृत्यूच्या संख्येतील विसंगती टाळण्यासाठी,जागतिक आरोग्य संघटनेच्या(डब्ल्यूएचओ) 

आयसीडी -10 कोड नुसार, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने  (आयसीएमआर)  भारतातील कोविड-19  संबंधित मृत्यूची योग्य नोंद करण्यासाठी उचित  मार्गदर्शन  केले आहे. 

याच विहित मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने, विविध प्रकारे औपचारिक माहितीचे प्रसारण करुन,अनेक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आणि केंद्रीय समिती तैनात करुन त्याद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूंची बिनचूक नोंदणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही दररोज जिल्हावार रुग्णसंख्या आणि मृत्यू यांची नोंदणी करण्यावर देखरेख ठेवण्यासाठी नियमित सक्षम अहवाल यंत्रणेची आवश्यकता असावी, यावर जोर दिला आहे.

हे सर्वांना माहित आहे, की कोविड-19 महामारीसारख्या, एखाद्या  गहन आणि दीर्घकाळापर्यंत चालणाऱ्या सार्वजनिक आरोग्य संकटाच्या काळात मृत्यूंची माहिती आणि  संपूर्ण देशभरात त्या रोगात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या यांचा योग्यरित्या आयोजित केलेला अभ्यास, सामान्यत: अशा घटना घडल्यानंतरच केला जातो, ज्यावेळी मृत्यूंची माहिती विश्वसनीय स्त्रोतांकडून उपलब्ध होते.  तरीही अशा अभ्यासासाठी असलेल्या कार्यपद्धती व्यवस्थित असून त्या प्रस्थापित झालेल्या आहेत, माहितीचे स्रोत परिभाषित केलेले आहेत तसेच मृत्यू दर मोजून वैध निष्कर्ष काढता येण्यासाठी देखील यंत्रणा आहे.

***

Umesh U/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1735337) Visitor Counter : 270