गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

सीपीडब्ल्यूडीने केला 167 वा वर्धापन दिन साजरा

Posted On: 12 JUL 2021 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2021

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने आज 12 जुलै 2021 रोजी देशाच्या गौरवशाली सेवेतील 167 वा वर्धापन दिन साजरा केला.  कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने डिजिटल स्वरूपात हा कार्यक्रम पार पडला.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तर गृहनिर्माण व शहरी कामकाज  राज्यमंत्री कौशल किशोर सन्माननीय अतिथी’ म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला  गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव  दुर्गाशंकर मिश्रा देखील उपस्थित होते.

सीपीडब्ल्यूडीवरील एक लघुपटही या कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आला. उद्‌घाटन सोहळ्यादरम्यान मान्यवरांच्या हस्ते सीपीडब्ल्यूडी फुलांचा चित्ररथ :एक मौल्यवान ठेवा ,ईआरपी ई-मॉड्यूल, निर्माण भारती -सीपीडब्ल्यूडीचे इन हाऊस प्रकाशन आणि सीपीडब्ल्यूडी टेलिफोन डिरेक्टरी 2021 चे प्रकाशन करण्यात आले. सीपीडब्ल्यूडीचे उपक्रम आणि कामगिरीचा आढावा घेणारा  एक लघुपट  दाखवण्यात आला.

या कार्यक्रमात विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सीपीडब्ल्यूडी पदके  प्रदान करण्यात आली आणि सीपीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि इतर तज्ञांद्वारे तांत्रिक सादरीकरण करण्यात आले.

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1734847) Visitor Counter : 176