नौवहन मंत्रालय
केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंत्रालयाकडून सुरू असलेल्या प्रकल्पांचा घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
11 JUL 2021 3:40PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंत्रालयाकडून सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांचा आज आढावा घेतला. केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव डॉ. संजीव राजन यांनी मंत्र्यांना मंत्रालयाच्या विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. मंत्र्यांनी देखील त्यांच्या कक्षात मंत्रालयाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधला.

सर्बानंद म्हणाले की, त्यांच्यावर दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील. ते पुढे म्हणाले की, यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या सर्व चांगल्या उपक्रमांना ते पुढे नेतील आणि कोणताही विलंब न करता नियोजित सर्व टप्पे गाठण्यासाठी ते त्यांच्या नवीन चमूसह गांभीर्याने प्रयत्न करतील.
केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव डॉ. संजीव राजन, मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय बंडोपाध्याय, सहसचिव (बंदरे) विक्रम सिंह, सहसचिव (प्रशासन) लुकास एल कामसुआन यांनी ट्रान्सपोर्ट भवन येथील मंत्रालयात मंत्र्यांचे आगमन झाल्यावर स्वागत केले.
***
M.Chopade/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1734587)
आगंतुक पटल : 309