उपराष्ट्रपती कार्यालय

गच्चीवर फुलवलेली बाग आपल्याला किफायतशीतर आणि पोषक आहार पुरवू शकते : उपराष्ट्रपती


मिडडे थोता' या पुस्तकाची पहिली प्रत उपराष्ट्रपतींना सादर

Posted On: 10 JUL 2021 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जुलै 2021

 

उपराष्ट्रपती श्री एम. वेंकैया नायडू यांना आज श्री थुम्मेती रघोथामा रेड्डी यांच्या ‘टेरेस गार्डन: मिडडे थोटा’ या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरची पहिली प्रत प्राप्त झाली. मूळ तेलुगू भाषेत लिहिलेल्या या पुस्तकात श्री रेड्डी यांनी हैदराबादच्या नारपल्ले येथे गच्चीवरील बाग सुफल विकसित करण्याचा यशस्वी प्रवासाचा इतिहास आहे. .हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अनुवादक श्री कोडुरु सीताराम प्रसाद आणि प्रकाशक श्री यादलापल्ली वेंकटेश्वर राव यांची  श्री. नायडू यांनी प्रशंसा केली.

आपल्या गच्चीवर फुलवलेल्या बागेत शेतीच्या पारंपरिक पद्धतींचा वापर केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी श्री रेड्डी यांचे कौतुक केले.गेल्या सात वर्षात श्री रेड्डी यांना 1230 चौरस फूट क्षेत्र जागेतील बागेतून 25 क्विंटल भाजीपाला मिळाला आणि हे सर्व उत्पादन केवळ माती आणि शेणखत यांचा वापर करून घेण्यात आले. श्री नायडू म्हणाले, ''पोषक आहार किफायतशीरित्या पुरवू शकणारी गच्चीवरील बाग ही एक चांगली कल्पना आहे''

'टेरेस गार्डन: मिडडे थोता' या पुस्तकात गच्चीवर बाग फुलवताना अवलंबता येणाऱ्या  व्यवहार्य  पद्धती आणि तंत्राची माहिती दिली आहे.

 

* * *

Jaydevi PS/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1734473) Visitor Counter : 198