अवजड उद्योग मंत्रालय

श्री. महेंद्र नाथ पांडे यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून पदभार स्वीकारला


श्री किशन पाल गुर्जर यांनी राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 09 JUL 2021 8:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जुलै 2021

श्री. महेंद्र नाथ पांडे यांनी आज केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.

या प्रसंगी माध्यमांशी बोलताना मंत्री म्हणाले की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारच्या धोरणांची परिश्रमपूर्वक अंमलबजावणी देशाच्या औद्योगिक क्षेत्रात केवळ आत्ताच नव्हे तर भावी पिढ्यांसाठी प्रामाणिकपणे केली जाईल.

डॉ. पांडे विद्यमान सरकारमध्ये आधी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री होते आणि त्यांनी 5 जुलै 2016 ते 2 सप्टेंबर 2017 या कालावधीत मनुष्यबळ विकास मंत्रालयात (आताचे शिक्षण मंत्रालय) राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. श्री. पांडे पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी आणि बनारस हिंदू विद्यापीठातून हिंदीमध्ये पीएच.डी. संपादन केली आहे.

आज, श्री किशन पाल गुर्जर यांनीही मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मंत्री यापूर्वी विद्यमान सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करत होते आणि त्यांनी हरियाणाच्या फरीदाबाद येथील शासकीय महाविद्यालयातून कला विषयात पदवी संपादन केली आहे आणि उत्तर प्रदेशच्या चौधरी चरण सिंह विद्यापीठातून एलएलबी केले आहे.

अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव श्री अरुण गोयल आणि मंत्रालयातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मंत्र्यांचे स्वागत केले.

 

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1734322) Visitor Counter : 506


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil